News Flash

सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

ही बाब काही नेटकऱ्यांच्या नजरेतून चुकली नाही आणि सोशल मीडियावर काही भन्नाट विनोदी मीम्सना उधाण आलं.

राधिका आपटे, radhika

‘सेक्रेड गेम्स’मधील प्रभावी भूमिकेनंतर अभिनेत्री राधिका आपटे ‘घौल’ या नेटफ्लिक्सच्याच सीरिजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘सेक्रेड गेम्स’मधील तिच्या भूमिकेच्या चर्चा शमत नाहीत तोच आणखी एका वेब सीरिजमुळे ती पुन्हा एकदा नेटफ्लिक्सच्याच पडद्यावर दिसली. ही बाब काही नेटकऱ्यांच्या नजरेतून चुकली नाही आणि सोशल मीडियावर काही भन्नाट विनोदी मीम्सना उधाण आलं.

व्हायरल होणाऱ्या या मीम्समधून राधिका आणि नेटफ्लिक्सच्या नात्याकडे विनोदी अंगाने दृष्टीक्षेप टाकण्यात आला होता. नेटफ्लिक्स इंडिया सुरु करताच सर्वत्र राधिका आपटेच दिसते, अशा आशयाचे हे धमाल मीम्स पाहून खुद्द राधिकानेच याविषयी तिची प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या मोठ्या स्तरावर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या नेटफ्लिक्ससोबत काम केल्याबद्दलची ही एक प्रकारची पोचपावतीच आहे, असं म्हणत राधिकाने या मीम्सला प्रशंसेच्या रुपात स्वीकारलं आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधत ती म्हणाली, ‘नेटफ्लिक्सकडून वेब सीरिजच्या उत्तम दर्जावर जास्त भर दिला जातो. इथे विषय निवडण्याचं, आगामी प्रोजेक्ट निवडण्याचं आणि या गोष्टींना कलात्मकपणे मांडण्याची मुभा आहे. मुख्य म्हणजे ही मुभा असूनही सीरिजच्या दर्जांमध्ये मात्र कधीच तडजोड केली जात नाही.’

वाचा : सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईत आलेल्या राधिकाकडे होता फक्त ‘या’ अभिनेत्याचा फोन नंबर

दरम्यान, नेटफ्लिक्स आणि वेब सीरिज विश्वात रमणारी राधिका येत्या काळात पुन्हा एकदा अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झळकणार असून, ‘बाझार’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. निखिल अडवाणीने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 4:06 pm

Web Title: bollywood sacred games fame actress radhika apte on viral social media memes
Next Stories
1 सुप्रिया पिळगावकर यांची पहिली वेब सीरिज ‘होम’ स्ट्रिमिंगसाठी सज्ज
2 खुशखबर! पुन्हा होणार सुरू ‘The Kapil Sharma Show’
3 Video : चाहत्यांचा घोळका पाहून गांगरली मौनी रॉय
Just Now!
X