News Flash

किंग खानने केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहुन तुमच्याही अंगावर येईल काटा

पाहा, शाहरुखचा स्टंट करतानाचा व्हिडीओ

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे खासकरुन त्यांच्या साहसदृश्यांसाठी आणि स्टंटसाठी ओळखले जातात. यामध्ये अक्षय कुमार, विद्युत जामवाल, टायगर श्रॉफ या कलाकारांची आवर्जुन नावं घेतली जातात. मात्र, सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा एक खतरनाक स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाहरुखचा हा स्टंट करतानाचा व्हिडीओ त्याच्या रेड चिली इन्टरटेन्मेंटच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख दुबईमध्ये हा स्टंट करत असल्याचं म्हटलं जात आहे.


या व्हिडीओमध्ये शाहरुख एका उंच इमारतीवर हवेत स्टंट करताना दिसत आहे. यात तो कॅज्युल लूकमध्ये असून हवेत लटकून त्याने उडी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- ‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद; पत्नीसाठी कपिलने घेतला महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरुख लवकरच पठाण या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण स्क्रिन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 1:52 pm

Web Title: bollywood shah rukh khan awesome air stunt video went viral people stunned watching this ssj 93
Next Stories
1 ‘तांडव’च्या वादावर शर्मिला टागोर यांनी सैफला दिला ‘हा’ सल्ला
2 ‘अर्णब की तांडव, सगळ्यात घातक कोण?’; दिग्दर्शकांचा थेट सवाल
3 कतरिनाने शेअर केला तिचा डायट प्लान, नेटकरी झाले खूश
Just Now!
X