News Flash

नानावटीतील डॉक्टरांमुळे वाचले अब्रामचे प्राण

सर्वात जास्त लाड अब्रामचेच होतात

शाहरुख मुलगा अब्रामसोबत

शाहरुख खानने शुक्रवारी नानावटी रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा) अॅण्ड बर्थिंग सेंटरचे अनावरण केले. यावेळी शाहरुखने प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. शाहरुखचा सर्वात लहान मुलगा अब्राम याचा जन्म झाला तेव्हा त्याचा जीव धोक्यात होता असे सांगत सर्वांना धक्का दिला. नानावटीतील डॉक्टरांनी अब्रामचे प्राण वाचवले असेही शाहरुखने यावेळी सांगितले.

नानावटी रुग्णालयाशी असलेल्या जवळीकीबद्दल शाहरुख म्हणाला की, डॉक्टर अली हे माझी, माझ्या बहिणीची आणि माझा छोटा मुलगा अब्रामची फार छान काळजी घेतात. जेव्हा अब्रामचा जन्म झाला होता तेव्हा आम्ही त्याला इथेच घेऊन आलेलो. माझ्या मुलाचे प्राण इथेच वाचले होते. या रुग्णालयातील एका वॉर्डला माझ्या आईचे नाव आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून मला काहीही झाले तरी इथेच उपचार घेतो. माझ्या बहिणीवरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

srk-nanavati

सगळ्यांनाच माहितीय की, शाहरुखचे त्याच्या मुलांवर फार प्रेम आहे. सध्या सर्वात जास्त लाड हे त्याचा लहान मुलगा अब्रामचेच होत आहेत. आता अब्राम पूर्ण बरा झाला असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही. शाहरुख त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याचे आणि अब्रामचे अनेक फोटो शेअर करत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 4:24 pm

Web Title: bollywood shahrukh khan son abram life was in danger praised nanawati hospital doctors
Next Stories
1 ‘पठडीबाहेरील लिखाण करणे आव्हानात्मक’
2 सत्यासाठी आवाज उठविण्याची गरज- अनुष्का शर्मा
3 जाणून घ्या, कपिल शर्माची होणारी बायको गिन्नी छत्राथविषयी…..
Just Now!
X