अन्न, वस्त्र, आणि निवारा या मुलभूत गरजा सर्वांना माहीत आहेत. पण यासोबतच शिक्षणसुद्धा तितकेच महत्वाचे आणि गरजेचे आहे. आजच्या युगात शिक्षणाशिवाय कुठलाच पर्याय नाही. शिक्षणासाठी जगभरातून लोकांचे भ्रमण होत असते, कोणी परदेशी शिक्षणासाठी जातं तर कोणी आपल्याच मायदेशी शिक्षण घेण्याचं ठरवतं. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. शिक्षणासाठी, कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू असतात. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की, या क्षेत्रातील स्पर्धकच आपणास अधिक पाहावयास मिळतात. विज्ञान-तंत्रज्ञानासोबत, कला, क्रीडा, संगीत शिक्षणातही कमालीची प्रगती झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत शिक्षणासाठी सर्वोत्तम असा देश समजला जातो. विश्वातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतात. भारतीय नृत्यकला ही खूप जुनी आणि सर्वोत्तम असल्याने भारतात नृत्यशिक्षणाला खूप महत्व आणि नृत्याचा सन्मान केला जातो. आजच्या फ्युजनच्या विश्वात सर्वांना शास्त्रीय नृत्यासोबत पाश्चिमात्य नृत्यकलेविषयी कुतूहल निर्माण झाल्याचं दिसतं.

ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजेच ‘बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री’चं सर्वांनाच आकर्षण आहे. बॉलिवूड चित्रपटविश्व हे अॅक्शन आणि ड्रामाने भरलेलं आहे. याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे “डान्स”. बॉलिवूड डान्स स्टाइल ही जगप्रसिद्ध आहे, हटके डान्स मुव्हस्, गाण्यांमुळे प्रेक्षकवर्ग आकर्षित होत असतो. चित्रपटातील नृत्य शिकणे आणि शिकवणे हे जितके मनोरंजक असते तितकेच आव्हानात्मकदेखील असते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हेच काम अगदी चोखपणे निभावणारे एकमेव नृत्यदिग्दर्शक म्हणजे शामक दावर.

शामक दावर हे नाव आपल्यासमोर आलं की सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ते, त्याची स्वत:ची अशी वेगळी डान्स थीम, निरनिराळे ड्रेसिंग स्टाइल्स आणि क्लासिकल आणि वेस्टर्न डान्स स्टाइलचा भन्नाट मेळ साधत साकारण्यात आलेले नृत्यप्रकार. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटामधून शामक यांनी सिने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. चित्रपट गाण्यांशिवाय शामकने त्याची नृत्यप्रशिक्षण संस्थाही सुरु केली. नृत्यकला ही फक्त कला नव्हे, तर एक करिअरसाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो असं शामकचं म्हणणं आहे.

आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अशा व्यक्ती आधाराव्यतिरिक्त काहीही हालचाल करू शकत नाही. पण शामकने दिव्यांगांनाही या कलेत पारंगत करत ही त्यांची ताकद बनवली. ‘विक्ट्री आर्ट फाऊंडेशन’ ही नृत्यशाळा खास दिव्यांग मुलांसाठी असून नृत्याच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ बनवण्यासाठी सुरू करण्यात आली. ‘विक्ट्री आर्ट फाउंडेशन’ मधील व्हीलचेयरवर बसलेली मुलं आज डान्स इन्स्ट्रक्टर अर्थात प्रशिक्षक म्हणून याच संस्थेत कार्यरत आहेत. शारीरिक व्याधींवर मात करून प्रगतीच्या शिखरावर पोहोचवण्याचे काम ‘विक्ट्री आर्ट फाऊंडेशन’ने केलं आहे.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

चौकटीबाहेर जाऊन नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा ठेवणारा शामक त्याच्या कामातून आपला हटके अंदाज सर्वांसमोर दाखवत असतो. देशातच नव्हे तर परदेशातही त्याने आपल्या नृत्यशाळा सुरु केल्या आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं काम हे जगावेगळं असावे आणि हीच शिकवण शामक दावर त्याच्या शिकवणीतून देत असतो. आत्मविश्वास आणि स्वबळाच्या जिद्दीवर कोणीही व्यक्ती आपलं ध्येय साध्य करू शकते असा विश्वास या मुलांमध्ये निर्माण करण्यात शामक नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणावं लागेल.