News Flash

‘मन्नत’वर सिता-यांची ‘जन्नत’!

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ३३ कोटींची कमाई केली आहे.

| August 11, 2013 12:31 pm

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ३३ कोटींची कमाई केली आहे. ईद आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाची पार्टी शनिवारी शाहरुखने त्याच्या मन्नत या बंगल्यावर आयोजित केली होती. यावेळी अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये दिलीप कुमार, सायरा बानू, दीपिका पादुकोण, हृतिक रोशन, माधुरी, दिग्दर्शक रोहित शेट्टी, सोनम कपूर, संगीतकार विशाल-शेखर, प्रभूदेवा, सुशांत सिंग राजपूत, श्रीदेवी, बच्चन कुटंबीय, रितेश-जेनेलिया आणि अन्य कलाकार उपस्थित होते. याचबरोबर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही पार्टीला आला होता. एकूणच शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यावर कलाकारांची ‘जन्नत’ होती.
पहिल्याच दिवशी ३३ कोटींचा आकडा गाठणाऱया ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने नवा विक्रम केला आहे. एकंदर शाहरुख-दीपिकाची चेन्नई-एक्स्प्रेस सुसाट सुटली असल्याचेच चित्र आहे. तसेच याआधी केवळ पेड प्रिव्ह्यूमुळे चित्रपटाने भारतात ६.७५ कोटींचा निव्वळ नफा कमवून २.७ कोटी इतका सर्वाधिक पेड रेकॉर्ड असलेल्या ‘३ इडियट्स’ चित्रपटाला मात दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2013 12:31 pm

Web Title: bollywood stars at shahrukhs jannat bunglow
Next Stories
1 पाहाः ‘पोपट’ चित्रपटाचा ट्रेलर
2 कार्टर रोडला राजेश खन्ना यांचे नाव द्या – डिंपल
3 शाहरूखलाही ईदचा मुहूर्त लाभदायक!
Just Now!
X