News Flash

बॉलिवूड विरुद्ध न्यूज चॅनेल्स वादात प्रकाश राज यांची उडी, म्हणाले…

बॉलिवूड विरुद्ध न्यूज चॅनेल्स : शाहरुख, सलमान आमिरसहीत निर्माते ‘या’ सहा जणांविरोधात कोर्टात

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयावर अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली.

अवश्य पाहा – “गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

“ब्रेकिंग न्यूज, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर. दिल्ली उच्च न्यायालयात रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात याचिका दाखल. खुप चांगला निर्णय.” अशा आशयाचं ट्विट करुन या दोन्ही कलाकारांनी शाहरुख, सलमान आणि आमिरला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:59 pm

Web Title: bollywood strikes back swara bhaskar prakash raj mppg 94
Next Stories
1 “तुमचा लूक बघून तुम्हाला सर्व बाहेरवालीचेच…”, असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला शेवंताचे उत्तर
2 “हा शो आता कंटाळवाणा झालाय”; माजी स्पर्धकांची ‘बिग बॉस’च्या नावानं बोंब
3 करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीलाच करोनाची लागण
Just Now!
X