News Flash

सौंदर्याने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते यश चोप्रा

६० ते ७०च्या दशकात यश चोप्रा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु होत्या

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांची आज २७ सप्टेंबर रोजी जयंती. यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. इतकेच नव्हे तर यश चोप्रा यांच्या चित्रपटांमधून अनेक बॉलिवूड कलाकारांना एक वेगळी ओळख देखील मिळवून दिली होती. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी यश चोप्रा यांनी जगाचा निरोप घेतला.

६० ते ७०च्या दशकात यश चोप्रा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांचे नाव यश चोप्रा यांच्यासोबत जोडण्यात आले होते. मुमताज यांनी त्यांच्या अदा, स्टाइल आणि अभिनयाने अनेकांच्या मनावर भूरळ घातली होती. मात्र लाखो मनावर राज्य करणाऱ्या मुमताज यश चोप्रा यांच्या प्रेमात होत्या. यश चोप्रा यांचे देखील मुमताजवर जीवापाड प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

‘आदमी और इंसान’ या चित्रपटात अभिनेत्री सायरा बानो यांची मुख्य भूमिकेसाठी तर मुमताज यांची सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र प्रेमापोटी यश यांनी चित्रपटात मुमताजसाठी एक स्पेशल गाणे चित्रीत केले होते. त्यामुळे चित्रपटात सायरा बानो यांच्या भूमिकेपेक्षा मुमताज यांच्या भूमिकेला जास्त महत्व प्राप्त झाले होते. या चित्रपटानंतर मुमताज आणि यश यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

यश आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा ऐकून यश यांचे भाऊ बी. आर. चोप्रा यांनी मुमताज यांच्या घरी लग्नाची मागणी घातली होती. लग्नानंतर मुमताज यांना त्यांचे करिअर सोडून घर सांभाळावे लागणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर मुमताज आणि यश यांच्या रिलेशनला पूर्णविराम लागला.

त्यानंतर काही दिवसांमध्ये यश चोप्रा यांनी पामेला सिंह यांच्याशी लग्न केले. तर दुसरीकडे मुमताज यांनी करिअरवर लक्ष केंद्रीत केले. काही दिवसातच अभिनेते राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र त्यांचे हे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही. शेवटी मुमताज यांनी एका उद्योगपतीशी लग्न करत फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:51 pm

Web Title: bollywood superhit director yash chopra fall in love with this actress avb 95
Next Stories
1 काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीला सलमान खान अनुपस्थित
2 ‘बिग बी’, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि ‘कुली’मधील तो अपघात, जाणून घ्या कनेक्शन
3 ठरलं! या दिवशी होणार ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनची वापसी
Just Now!
X