News Flash

मिलिंदच्या आयुष्यात परतलं प्रेम?

प्रेमाची परिभाषा वेगळीच असते.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

प्रेम ही एक अशी भावना आहे ज्याला कोणत्याही मर्यदा नसतात. त्यासाठी ठराविक अशा प्रसंगाची, ठिकाणाची गरज नसते. किंबहुना प्रेमात कोणतेही व्यवहार नसतात. म्हणूनच की काय या प्रेमावर आजवर अनेकांनी बरंच साहित्य लिहून ठेवलं आहे. कलाविश्वासाठी प्रेमाची परिभाषा वेगळीच असते. अशाच बदलत्या प्रेमाच्या परिभाषेचा गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्यय आला आहे. दिग्दर्शक- अभिनेता अनुराग कश्यपच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणाच्या चर्चा थांबत नाहीत तोच बी- टाऊनमधील आणखी एका अभिनेत्याचं प्रेमप्रकरण सर्वांसमोर आलं आहे. फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता, ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ मिलिंद सोमणचं Milind Soman प्रेमप्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरुणीसोबत मिलिंद रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात आहे.

५१ वर्षीय मिलिंद जवळपास त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या अंकिता कुंवर हिच्यासोबतच्या काही फोटोंमध्ये चर्चेत आहे. मुख्य म्हणजे अनुराग कश्यपप्रमाणेच मिलिंदने त्याच्या या लेडी लव्हसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो आणि त्यासोबतचं कॅप्शन पाहता मिलिंदच्या आयुष्यात प्रेम परतलं आहे असंच म्हणावं लागेल. शारीरिक स्वास्थ्याकडे सर्वाधिक लक्ष देणाऱ्या मिलिंदचे अंकितासोबतचे फोटो पाहता तिसुद्धा ‘फिटनेस फ्रिक’ असल्याचं लक्षात येत आहे. त्यामुळे आता मिलिंद त्याच्या या नात्याची अधिकृत घोषणा कधी करतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

milind-1

milind

सुपरमॉडेल, अभिनेता, निर्माता अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेल्या मिलिंद सोमणने याआधी फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ Mylene Jampanoi हिच्यासोबत २००६ मध्ये लग्न केलं होतं. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे निदान आतातरी मिलिंदच्या आयुष्यातील अंकिताच्या रुपातलं हे प्रेम टिकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला मिलिंद कोणत्याही चित्रपटामध्ये सक्रिय नसला तरीही सोशल मीडियावरच्या त्याच्या पोस्टमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. ‘मेड इन इंडिया’ अल्बमपासून ते ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ किताब पटकावणारा मिलिंद तरुणांसाठी आदर्शस्थानी आहे.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:54 pm

Web Title: bollywood supermodel actor film producer and fitness promoter milind soman finds love again in a girl half his age see photos
Next Stories
1 Father’s Day 2017 : ….आणि बाबांनी मला झेलले- रसिका सुनील
2 युद्ध करण्यापेक्षा समोरा समोर बसून बोला, सलमानचा भारत- पाकला सल्ला
3 सुनील ग्रोवरच्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’साठी कपिलच्या शोला डच्चू
Just Now!
X