‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखला जाणारा आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या मिलिंद सोमणची सध्या बरीच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. ही चर्चा होतेय त्याच्या एका वक्तव्यामुळे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘शेफ’ नंतर मिलिंद रुपेरी पडद्यावर तसा फार क्वचितच दिसला. याचं कारणही नुकतंच त्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे. आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही काम देत नाही अशी खंत मिलिंदनं बोलून दाखवली आहे.
‘या कलाविश्वात काम मिळवायचं असेल तर तुमच्या ओळखी लागतात आणि मी फारसा कुणाच्याही संपर्कात नसतो. त्यामुळे कदाचित माझ्याकडे काम येत नसेल. कधीतरी चुकून मला बॉलिवूडमधील चित्रपटात भूमिका मिळतात. मी जे मिळेल ते काम करतो. भूमिका किती मोठी आणि लहान आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही ती किती चांगल्या प्रकारे करतात हे महत्त्वाचं आहे’ असं मिलिंद आएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. याव्यतिरिक्त अभिनेता सलमान खानच्या वार्षिक उत्पन्नाची चर्चाही बी- टाऊनमध्ये सर्वांचच लक्ष वेधून गेली. चला तर मग जाणून घेऊया कलाविश्वातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल….
संजयने सांगितलं त्याच्या आगामी चित्रपटाचं ‘वास्तव’?
‘त्या’ केवळ अफवाच, हृतिकची माध्यमांवर आगपाखड तर दिशानं केली पाठराखण
Photo : सरताज सिंगनंतर सैफचा कधी न पाहिलेला अवतार
सलमानची संपत्ती आहे तरी किती? वाचा
पहिल्यांदाच ‘कपल’ म्हणून समोर येणार रणबीर- आलिया
साराशी माझी तुलना का?, जान्हवी कपूरचा सवाल
‘त्या’ पोस्टमुळे फरहान- शिबानीच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा
टीआरपीत अव्वल असलेली ‘ये है मोहब्बते’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
‘लव सोनिया’साठी सई पुन्हा झाली ‘वजनदार’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 7:16 pm