05 March 2021

News Flash

विनोद खन्ना रुग्णालयात दाखल

कुटुंबियांकडून अधिक माहिती देण्यास नकार

विनोद खन्ना

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एचएन रिलायन्स फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. खन्ना यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली नसली तरी, कोणतीही गंभीर बाब नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

‘मला काहीही सांगण्याची परवानगी नाहीये. पण, मी इतकंच सांगू शकतो की, विनोदजींची प्रकृती व्यवस्थित आहे. सध्या त्यांची योग्य ती काळजी घेतली जात असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल अशी आम्ही आशा करतो.’ असे सूत्रांमार्फत सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रुग्णालयातील अधिकृत व्यक्तिला विचारले असता त्यांच्याकडून विनोदजींबद्दलची माहिती मिळाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. ‘त्यांना शुक्रवारी नव्हे तर, रविवारी २ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खन्ना यांच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरूनच त्यांच्या प्रकृतीविषयीची कोणतीही माहिती माध्यांमध्ये सांगण्यात आली नाहीये.’, असे रुग्णालयाशी संलग्न एका व्यक्तीने सांगितले. विनोद खन्ना यांची मुलं अक्षय आणि राहुल खन्ना यांनीही त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीच माहिती दिली नसल्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये विनोद खन्ना यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 8:33 pm

Web Title: bollywood veteran actor vinod khanna hospitalised
Next Stories
1 करणच्या जुळ्या मुलांबद्दल काजोल म्हणते..
2 बयोआजींच्या ‘कान’वारीमुळे राधाची सुटका?
3 Begum Jaan Making: पडद्यामागची ‘बेगम जान’
Just Now!
X