News Flash

अभिनेत्री विद्या बालनचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

विद्याने या फिल्मचा फर्स्ट लूक शेअर केला आहे

कलाविश्वामध्ये यशस्वी होण्यासाठी रंगरुप किंवा सुडौल बांधा गरजेचा नसून उत्तम अभिनय आहे, हे अभिनेत्री विद्या बालनने सिद्ध करुन दाखवलं. बऱ्याच वेळा बॉडीशेमिंगमुळे ट्रोल झालेल्या या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘परिणीता’, ‘हे बेबी’ या चित्रपटांमध्ये साध्या रुपात दिसणाऱ्या विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून तिच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. कलाविश्वात अनेक चढ-उतार पाहून आज यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने तिचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळविला आहे. तिने एका लघुपटाची निर्मिती केली असून याविषयीची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे.

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री ‘नटखट’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचा फर्स्ट लूक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या लघुपटात ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत एक लहान मुलगादेखील आहे.

‘माझी एक गोष्ट ऐकाल का?. अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका पार पाडणारी माझी ही पहिली फिल्म आहे’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या चित्रपटात विद्या सुरेखा ही व्यक्तीरेखा साकरत असून ती एका आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या लघुपटाचं दिग्दर्शन रॉनी स्क्रूवालाने केलं आहे.

दरम्यान, विद्या गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे. उत्तम अभिनयामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री कलाविश्वात घडणाऱ्या अनेक घटनांवर उघडपणे व्यक्त होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 11:30 am

Web Title: bollywood vidya balan debuts as producer with natkhat short film also playing lead role shares first look poster ssj 93
Next Stories
1 “फोटोग्राफरने सलमानला मला किस करायला सांगितलं होतं, पण..”; भाग्यश्रीने सांगितला किस्सा
2 महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटवर आयुषमान खुरानाचं मराठीत उत्तर, म्हणतो…
3 चलाओ ना नैनो से बाण रे! घायाळ करणारा शेवंताचा फोटो
Just Now!
X