बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये आपापसांत चालणारी स्पर्धा काही नवीन नाही. आपण दुसऱ्यांपेक्षा कशाप्रकारे वरचढ आहोत हे दाखविण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो. सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांसारख्या आघाडीच्या तारकांमध्ये तर चित्रपटातील भूमिकेपासून ते सार्वजनिक जीवनातील पेहरावापर्यंत प्रत्येक बाबतीत स्पर्धा असल्याचे दिसून येते. मात्र, सध्या पेहरावाच्या बाबतीत एकमेकांची नक्कल करण्याची स्पर्धा या अभिनेत्रीमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी ‘टु-स्टेटस’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आलिया भट शुभ्र रंगाचा आणि त्यावर बदामाच्या आकारची नक्षी असलेला स्वेटर घालून आली होती. असाच स्वेटर घालून आयफा सोहळ्याला जाण्यासाठी टोटल सियाप्पा चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम विमानतळावर दाखल झाली. यानिमित्ताने बॉलीवूडमध्ये पेहरावांच्या बाबतीत एकमेकांची नक्कल करण्याच्या ‘सेम टू सेम’ ट्रेंडचा घेतलेला हा आढावा.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.