01 March 2021

News Flash

बॉलिवूडची गुड्डी आता मराठीत; चित्रपटांचा सिलसिला पुन्हा सुरु

जया बच्चन यांचा कमबॅक; सात वर्षांनी पुन्हा पडद्यावर

‘गुड्डी’, ‘अभिमान’, ‘सिलसिला’, ‘कभी खुशी कभी गम’ सारख्या अनेक नव्या जुन्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटविश्वात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. काही काळ पडद्यावरून विश्रांती घेतल्यानंतर आता त्या पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहेत.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री जया बच्चन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, त्यांचा हा कमबॅक एका मराठी चित्रपटातून होणार आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे लवकरच एक चित्रपट करत आहेत. त्याचं चित्रीकरण मार्चमध्ये सुरु होणार असल्याचं कळतंय. अवघ्या २० दिवसांत चित्रीत होणाऱ्या या मराठी चित्रपटात जया बच्चन कोणत्या भूमिकेत दिसतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणार याबद्दल दुमत नाही.

जया यांचा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. २०१२ मध्ये रितुपर्ण घोष यांच्या सनग्लास या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांनी मोठ्या पडद्यावरून काही काळ रजा घेतली होती. पण आता त्या आपल्या पुनरागमनासाठी सज्ज होत आहेत.

गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटात त्या दिसतील. गजेंद्र आपल्या चित्रपटातील वेगळेपणामुळे ओळखले जातात. विषयांचं वेगळेपण, मांडणीची पद्धत, कलात्मक चित्रीकरण ही त्यांच्या शैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता जया यांच्या वाट्याला गजेंद्र यांच्या जादुई बटव्यातून कोणती भूमिका येते हे पाहण्यासाठी मराठी रसिकप्रेक्षकांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टी उत्सुक असणार हे मात्र नक्की!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 7:18 pm

Web Title: bollywoods guddi is back in films vk98
Next Stories
1 RaGa की NaMo?; Twitter Poll वर काँग्रेस समर्थकांचे स्क्रीनशॉर्ट पाहून अभिनेता रणवीर शौरी संतापला; म्हणाला…
2 अदा शर्माने केला आजीसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकाराचे झाले जग्गू दादाशी भांडण, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X