News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात बोमण इराणींची भूमिका

अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे.

बोमण इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. विवेकनंतर या चित्रपटामध्ये आणखी एका नावाजलेल्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेता बोमण इराणी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये बोमण इराणी यांची मुख्य भूमिका असेल असं सांगण्यात येत असून ते नक्की कोणती भूमिका वठविणार आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

‘ऐतिहासिक चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद आणि आनंदाची बाब आहे. या चित्रपटासाठी संदीप सिंह (निर्माता), उमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय अशी तगडी टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. नव्या वर्षाची ही शानदार सुरुवात असून या अविस्मरणीय प्रवासासाठी मी तयार आहे’, असं बोमण इराणी म्हणाले.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातील चित्रपटाचे २३ भाषेत पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचं गुजरातसह देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असून या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चहाविक्रेता ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:23 pm

Web Title: boman irani join pm modi film
Next Stories
1 लोककला, लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘एकदम कडक’ कार्यक्रम
2 ‘डोक्याला शॉट’मधून मिका सिंगचे मराठीत पदार्पण
3 ‘ठाकरे’साठी नवाजुद्दीन नव्हे तर या अभिनेत्याला होती पहिली पसंती
Just Now!
X