25 September 2020

News Flash

…तर ‘३ इडियट्स’मध्ये बोमन इराणीऐवजी इरफानने साकारली असती ‘व्हायरस’ची भूमिका

बोमन यांनीच सांगितला या भूमिकेसंदर्भातील कधीही न ऐकलेला किस्सा

बोमन इराणी आणि इरफान खान

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ या चित्रपट हा अनेक अर्थांनी खास आहे. अगदी कमाईचे विक्रम असो किंवा चित्रपटाची कथा, गाणी किंवा अगदी कलाकार सर्व काही छान जुळून आल्यानंतर एक उत्तम कलाकृती कशी तयार होते याचे उदाहरण म्हणजे ‘३ इडियट्स’. या चित्रपटामधील अनेक भूमिकांकडे आजही पाहिल्यावर ती इतर कोणत्या अभिनेत्याने अधिक चांगल्या प्रकारे साकारली असती असं ठामपणे सांगता येणार नाही. म्हणजे अगदी आमीर खानने साकारलेला रँचो असो किंवा आर. माधवनने साकारलेला फरहान असो प्रत्येक कलाकाराची निवड अगदी योग्यच आहे हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. याच चित्रपटामध्ये बोमन इराणी यांनाही महाविद्यालयाच्या डीनची भूमिका अगदी चोख पार पडली. मात्र चित्रपटामध्ये रँचोने ‘व्हायरस’ हे टोपण नाव दिलेली ही भूमिका करण्यास बोमन यांनी नकार दिला होता. आपल्याऐवजी इरफान खानला या भूमिकासाठी विचारावे असं बोमन यांनी हिरानी यांना कळवलं होतं. याबद्दल बोमन यांनीच नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माहिती दिली.

बोमन इराणी यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘३ इडियट्स’मधील भूमिकेसंदर्भात माहिती दिली. हिरानी यांनी या भूमिकेसाठी बोमन यांना विचारले होते त्यावेळी त्यांनी ही भूमिका मुन्नाभाईमधील भूमिकेप्रमाणेच असल्याचे सांगत ती साकारण्यास नकार दिला होता. “तुम्ही जर नीट या दोन्ही भूमिकांकडे पाहिले तर दोन्ही सारखीच पात्रं आहेत हे तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पात्रांमध्ये खूप साम्य आहे. ते दोघेही डीन आहेत. दोघांच्याही मुली अशा हिरोच्या प्रेमात पडतात जो या दोघांच्या डोळ्यात खुपत असतो,” असं या भूमिकांमधील साम्य सांगताना बोमन म्हणाले. याचमुळे त्यांनी मुन्नाभाईनंतर पुन्हा एकदा अशीच भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

“मी त्यावेळी हिरानी यांना इरफानला या भूमिकेसाठी घेण्याचा सल्ला दिला होता. इरफान जी भूमिका साकारतो अगदी उत्तम प्रकारे साकारतो असं कारणही मी त्यावेळी दिलं होतं,” असं या मुलाखतीमध्ये बोमन यांनी सांगितलं.  मात्र बोमन यांनी दिलेला सल्ला हिरानी यांना पटला नाही. “या भूमिकेसाठी इरफान खूप तरुण वाटेल असं हिरानी यांनी मला सांगितलं. त्यावेळी म्हणजे मी खूप वयस्कर आहे का असा सवाल हिरानी यांना केला आणि आम्ही दोघेही हसत सुटलो,” अशी त्या चर्चेच्या वेळेची आठवणही बोमन यांनी सांगितली. नंतर आपण हिरानी यांच्याबरोबर या भूमिकेबद्दल चर्चा करुन ती मुन्नाभाईमधील भूमिकेपेक्षा थोडी वेगळी कशी वाटेल याबद्दल चर्चा करुन भूमिका साकारण्यास होकार दिल्याचेही बोमन यांनी स्पष्ट केलं.

म्हणजेच हिरानी यांनी बोमनचा सल्ला ऐकला असता तर आपल्याला ‘व्हायरस’च्या भूमिकेमध्ये बोमन यांच्याऐवजी इरफान खानला पहण्याची संधी मिळाली असती. तुम्हाला आवडलं असतं का या भूमिकेत इरफानला पाहणे? कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 10:08 am

Web Title: boman irani wanted irrfan to play virus in 3 idiots but raju hirani felt he was too young scsg 91
Next Stories
1 सुबोध भावेची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क; हजारांमध्ये नव्हे तर रुपयांमध्ये मिळालं होतं मानधन
2 “माझ्याकडे औषधं, भाजी विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत”, महाभारतातील अभिनेत्याने मांडली व्यथा
3 दिवंगत अभिनेत्याविषयी अपमानास्पद ट्विट केल्याने अभिनेत्यावर गुन्हा दाखल
Just Now!
X