News Flash

ऑस्कर विजेता अभिनेता करणार बॉण्डपटात विलनचा रोल

पाच दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा ‘जेम्स बॉण्ड’ ही हॉलिवुड इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे.

अभिनेता रॅमी मॅलेकला ऑस्कर २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

पाच दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा ‘जेम्स बॉण्ड’ ही हॉलिवुड इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. जेम्स बॉण्ड चित्रपट मालिकेतील २५वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ऑस्कर पुरस्कार विजेता रॅमी मॅलेक प्रमुख खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे.

अभिनेता रॅमी मॅलेकला ऑस्कर २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याने दी बोहेमियन ऱ्हाप्सडी या संगीतपटात केलेली रॉकस्टार फ्रेडी मर्क्युरीची भूमिका गाजली होती. आजपर्यंत नीड फॉर स्पीड, नाइट अॅट द म्यूझियम, द मास्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारणाऱ्या रॅमीला दी बोहेमियन ऱ्हाप्सडी या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवुन दिली. आणि याच लोकप्रियतेमुळे आता त्याची बॉण्डपटामध्ये निवड करण्यात आली आहे.

जेम्स बॉण्डचा अगामी चित्रपट नोव्हेंबर २०१९मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील खलनायची भूमिका निश्चित झाली असली तरी गेले दोन वर्ष बॉण्ड म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता डॅनियल क्रेगबाबतही निर्माते संभ्रमात होते. लेखक रॉबर्ट वेड यांचा डॅनियल क्रेगला विरोध होता. त्यांच्या मते डॅनियल एक उत्तम अभिनेता असून बॉण्ड व्यक्तिरेखा त्याने चांगल्या प्रकारे साकारली आहे, परंतु कथानकाचा विचार करता त्याचे वय आणि व्यक्तिरेखेचे वय यात तफावत आहे, म्हणून त्यांचा विरोध होता. परंतु दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेलने मात्र डॅनियलला हिरवा कंदील दिला. त्यांच्या मते तो अनुभवी असून या भूमिकेसाठी तोच योग्य आहे. लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांमध्ये सुरु असलेला हा वाद शेवटी चाहत्यांमुळे मिटला. डेनियलची जेम्स बॉण्ड म्हणून असलेली लोकप्रियता पाहुन पुन्हा एकदा त्याची निवड करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 5:17 pm

Web Title: bond 25 rami malek deal to play villain
Next Stories
1 नवाजलाही वाटतंय बॉलिवूडमध्ये ‘खान’चा जमाना न संपणारा
2 Pulwama Attack : शहिद जवानाच्या कुटुंबीयांना मानले अक्षय कुमारचे आभार
3 विराटला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर तमन्नाने सोडलं मौन
Just Now!
X