चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची मुलं आपल्या आई-वडीलांप्रमाणेच या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने पाहत असतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक कलाकारांच्या मुलांनी क्षेत्रामध्ये पदार्पणही केलं आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मोठ्या मुलगीच जान्हवी कपूरचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण झालं. ‘धडक’ या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. आता श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशीसुद्धा अभिनयात करिअर करणार असल्याची चर्चा आहे. खुशीचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सांगितलं.
खुशीला खरं तर मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं. एक उत्तम मॉडेल होण्यासाठी तिचे प्रयत्नही सुरु होते. मात्र आता तिच्या या निर्णयामध्ये अचानक बदल झाला असून तिला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे आहे. मॉडेलिंग क्षेत्रात कामाची शाश्वती नसल्यामुळे खुशीने हा निर्णय घेतला आहे, असं बोनी कपूर म्हणाले.
पुढे ते असंही म्हणाले. खुशीची आई श्रीदेवी कामाच्या बाबतीत परफेक्ट होती. आपलं काम चोख असावं यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असते. आपल्या दोन्ही मुलींनीदेखील याच क्षेत्रात करिअर करावं अशी तिची इच्छा होती. यात माझी फक्त एकच इच्छा होती. माझ्या मुलींना ज्या क्षेत्रात इंटरेस्टर आहे त्याच क्षेत्रात त्यांनी करिअर करावं आणि त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबाही असेल.
दरम्यान, काही काळापूर्वी करण जोहर जान्हवीप्रमाणेच खुशीलादेखील बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर खुशी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे आता खुशी खरंच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.