08 July 2020

News Flash

बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या तिघांची करोना चाचणी निगेटीव्ह

बोनी कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींना करोना झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या तिन व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आता बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या तिघांचे करोना चाचणीचे रिपोर्ट आल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे.

बोनी कपूर यांनी ट्विटमध्ये त्यांच्या घरातील तिन्ही व्यक्तींचे करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे म्हटले आहे. ‘मला हे सांगताना आनंद होत आहे की, माझे आणि माझ्या मुलींचे करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आमच्या घरात काम करणाऱ्या तीन व्यक्तींना करोनाचा संसर्ग झालेला होता. पण आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट आता निगेटीव्ह आले आहेत. आमचा १४ दिवसांचा होम क्वारंटाइनचा कालावधी देखील संपला आहे आणि आता आम्ही नवीन सुरुवात करत आहोत’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, ‘मी आणि माझे कुटुंबीय डॉक्टर, हेल्थ केअर, बीएमसी, मुंबई पोलिस, राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंबा आणि मदतीसाठी त्यांचे आभार मानतो’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 7:49 pm

Web Title: boney kapoor tweet on 3 corona positive staff members tested negative in final report avb 95
Next Stories
1 अभिनेत्याच्या मदतीला आला सोनू सूद धावून, फोन करुन केली विचारपूस
2 अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकवा… दिग्दर्शकाने दिलं भारतीयांना चॅलेंज
3 Video : समाजातील प्रत्येक घटनेवर रोखठोक मत मांडणाऱ्या जितेंद्र जोशीची अनकट मुलाखत
Just Now!
X