News Flash

‘देवसेना’ आता बॉलिवूडमध्येही झळकणार?

अनुष्काला सिनेमात काम करण्यासाठी श्रीदेवीच मनवू शकते

अनुष्का शेट्टी

दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा ‘बाहुबली २’ सिनेमा सध्या कोटींच्या कोटी उड्डाणे घेतो आहे. या सिनेमाचा फायदा जेवढा निर्मात्यांना सध्या होतो आहे. तेवढाच किंबहुना त्याहून जास्त फायदा कलाकारांना होतो आहे.

आता हेच बघा ना… बॉलिवूडमध्ये काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. काहींना ती संधी मिळत नाही तर काही मिळालेल्या संधीचं सोनं करतात. ‘बाहुबली’मधील कलाकारांना आता राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. त्यामुळे यातले कलाकार बॉलिवूडमध्ये कधी दिसतील असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यातही राणा डग्गुबती आणि तमन्ना भाटिया यांनी हिंदी सिनेमांत काम केले आहे. पण ‘बाहुबली’ आणि ‘देवसेने’ला हिंदी सिनेमात बघायला त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. पण आता तुमची इच्छा पूर्ण होणार असंच वाटतंय… देवसेना कदाचित हिंदीमध्येही दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर लवकरच ‘बाहुबली’ची ‘देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याच्या चर्चा आहेत. बोनी यांनी अनुष्काला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली असून, आता प्रतीक्षा आहे ती फक्त अनुष्काच्या होकाराची. जर अनुष्काने बोनी कपूर यांचा प्रस्ताव स्वीकारलाच तर लवकरच प्रेक्षकांना देवसेनेचा अभिनय हिंदी सिनेमातही पाहायला मिळणार.

खरेतर अनुष्काला बोनी यांच्या सिनेमात काम करण्यासाठी श्रीदेवीच मनवू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आजही श्रीदेवीच्या नावाचा दबदबा आहे. श्रीदेवी तिथल्या अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना ओळखते. त्यामुळे या ओळखीचा फायदा घेऊन ती अनुष्काला बोनी यांच्या सिनेमात काम करण्यासाठी गळ घालू शकते. पण तरीही हिंदी सिनेमांत करायचे की नाही हे मात्र अनुष्कावर अवलंबून आहे.

जेव्हापासून ‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित झाला, त्या दिवसांपासून बाहुबलीमधील कलाकारांवर नवीन सिनेमांत काम करण्यासाठी ऑफर्सचा पाऊस पडत आहे. पण यातही अनुष्काला आदित्य चोप्रा, विधू विनोद चोप्रा अशा अनेक बड्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमात काम करण्यासाठी विचारले आहे. अर्थात अनुष्काने अद्याप एकही ऑफर स्वीकारलेली नाही. तिला योग्य तो निर्णय घ्यायला वेळ हवा आहे. बॉलिवूडमधील पदार्पणासाठी योग्य सिनेमाची निवड करण्याची तिची योजना आहे. अनुष्काने ‘बाहुबली २’मध्ये देवसेनेची भूमिका साकारली होती. अमरेंद्र बाहुबलीची पत्नी बनलेल्या अनुष्काच्या अभिनयाचे कौतुक सध्या अनेक पातळींवरून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:30 pm

Web Title: boney kapoor wants to launch anushka shetty in bollywood
Next Stories
1 …यांच्यामुळे बॉलिवूडला मिळाली अनुष्का शर्मा
2 या अभिनेत्याचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक
3 आलिया माझी चांगली मैत्रीण- वरुण धवन
Just Now!
X