News Flash

‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर शेकोटी, गप्पा आणि बरंच काही…

डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची ऑफ-स्क्रीन धमाल

सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यात सर्वजण दंग आहेत. झी युवावरील डॉक्टर डॉन या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कडाक्याची थंडी असल्यामुळे रात्री शूटिंग करताना कलाकार थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत.

उब मिळवण्यासाठी हे सर्व कलाकार मिळून सेटवर शेकोटी करून माहोल बनवत आहेत. त्या शेकोटीमधून उब घेऊन धमाल गप्पा रंगताना दिसत आहेत. डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकार ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन सुद्धा अशीच धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात. कधी गिटार वाजवून गाण्यांची मैफिल तर कधी सेटवर पक्वान्नांची मेजवानी रंगलेली असते. पण सध्या या थंडीच्या ऋतूमध्ये सर्व कलाकार या थंडीचा आनंद घेण्यात मग्न आहेत आणि याचेच काही खास फोटोज मालिकेच्या चाहत्यांसाठी शेअर करण्यात आले आहेत.

सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आणि अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:57 pm

Web Title: bonfire and quality time spending by doctor don marathi serial team ssv 92
Next Stories
1 आर्थिक संकटामुळे करावे लागले होते ‘ते’ चित्रपट; अनिल कपूर यांचा खुलासा
2 शाहिद कपूर सोशल मीडियावर मागतोय काम; पत्नी मीराला ठरवलं जबाबदार
3 बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत; केबीसीतील चर्चेनंतर झाला खुलासा
Just Now!
X