News Flash

आयुषमानला खास दिवाळी भेट; ‘बधाई हो’ १०० कोटी पार

१०० कोटींचा गल्ला जमवणारा 'बधाई हो' हा आयुषमानच्या करिअरमधील पहिला चित्रपट ठरला आहे.

बधाई हो

अभिनेता आयुषमान खुरानासाठी ऑक्टोबर हा महिना अत्यंत यशस्वी ठरला असं म्हणावं लागेल. ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ असे आयुषमानचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर हीट ठरले. ‘बधाई हो’ या चित्रपटाने १७ दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली.

भारतात या चित्रपटाने १७ दिवसांत १००.१० कोटी रुपये कमावले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी ‘बधाई हो’ या चित्रपटाने जवळपास ७.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आयुषमानच्या करिअरमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुट्ट्यांचाही चांगला फायदा झाला आहे. केवळ भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियातही आयुषमानच्या या चित्रपटाने कमाल केली आहे.

वाचा : इरफान खान नाशिकमध्ये करणार दिवाळी साजरी

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. एकूणच आपल्या दैनंदिन जगण्यात अशा अनेक विसंगती आहेत, ज्या लक्षात घेऊन आपण आपलेच नाही तर आपल्याबरोबरच्यांचेही जगणे सुंदर करू शकतो. पण लक्षात कोण घेतो? अशा परिस्थितीत ‘बधाई हो’सारखा अतिशय चांगला बदलत्या काळानुसार कौटुंबिक मूल्ये मांडणारा निखळ चित्रपट पर्वणी ठरतो.

चित्रपटाची कमाई-
पहिला आठवडा- ६६.१० कोटी रुपये
दुसरा आठवडा- २८.१५ कोटी रुपये
तिसरा आठवडा- ९.७५ कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 4:07 pm

Web Title: box office collection ayushmann khurrana sanya malhotra badhaai ho crosses rs 100 crore mark
Next Stories
1 Video : ‘गॅटमॅट’ मधील रसिकाचं ‘हे’ गाणं ठरतंय सुपरहिट
2 इरफान खान नाशिकमध्ये करणार दिवाळी साजरी
3 #HappyBirthdayVirat : अनुष्कानं मानले देवाचे आभार
Just Now!
X