26 September 2020

News Flash

बहोत हार्ड है भाय! परदेशातही ‘गली बॉय’ची हवा

परदेशी प्रेक्षकांनाही या चित्रपटाची भुरळ पडली आहे

गली बॉय

२०१९ या वर्षातला सर्वाधिक चर्चेचा आणि प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणारा चित्रपट अजून तिकीटबारीवर आपल्य राज्य कायम करुन आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला हा चित्रपट केवळ देशातच नाही,तर परदेशातही लोकप्रिय ठरत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सादर करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये रणवीर मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्या अभिनयाची छाप हॉलिवूडमधील कलाकारांवरही पडली आहे. काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने रणवीरवर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यानंतर येथील प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची भुरळ पडल्याचं दिसून येत आहे.

‘गली बॉय’ने परदेशात केलेल्या कमाईची आकडेवारी तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. या चित्रपटाने परदेशामध्ये एकूण ४२.७० कोटी रुपयांची कमाई केल्याचं दिसून येत आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या चित्रपटाने ३० लाख डॉलरचा टप्पा पार केला आहे. तर युएईमध्ये १२ लाख डॉलर, युकेमध्ये ४ लाख ३० हजार डॉलर, ऑस्ट्रेलियात ५ लाख ४२ हजार डॉलर रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, ‘गली बॉय’ने देशात बुधवारपर्यंत ९४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून लवकरच हा चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे. विशेष म्हणजे रणवीरने या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचं मानधन घेणं बंद केलं असून तो आता चित्रपटाच्या कमाईमधील अर्धा हिस्सा घेणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 11:51 am

Web Title: box office collection gully boy is having an incredible run
Next Stories
1 शिबानी आणि फरहानची 365 दिवसांची सोबत, शेअर केला फोटो
2 Video : प्रत्येकाला आपलासा वाटणारा ‘आम्ही बेफिकर’चा ट्रेलर प्रदर्शित
3 रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार ?
Just Now!
X