07 April 2020

News Flash

जाणून घ्या, ‘बाटला हाऊस’च्या पहिल्या दिवसाची कमाई

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' एकाच दिवशी प्रदर्शित झाले

२००८ साली दिल्लीतील बाटला हाऊस चकमक प्रकरणावर आधारित ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमने एसीपी संजय कुमार या पोलीस अधिकाऱ्याच्या व्यक्तीरेखा साकारली असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्टलाच अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे ‘बाटला हाऊस’च्या कमाईवर त्याचा परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

‘बाटला हाऊस’ने पहिल्या दिवशी केवळ १४.५९ कोटी रुपयांची सरासरी कमाई केली असून या कमाईमध्ये विकेंडच्या दिवशी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच दिवशी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला  ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.  भारताच्या मंगळ मोहिमेची कथा सांगणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९.१६ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळेच या चित्रपटाचा परिणाम बाटला हाऊसवर झाल्याची चर्चा रंगली आहे.


निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘बाटला हाऊस’ या चित्रपटामध्ये जॉनने एसीपी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारली आहे. तर मृणाल ठाकूरने त्यांच्या पत्नीची भूमिका वठविली आहे. दरम्यान, १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलचे अधिकारी के के (रवी किशन) आणि संजीव कुमार यादव (जॉन अब्राहम) आणि त्यांच्या टीमने ‘बाटला हाऊस’ एल- १८ क्रमांकच्या इमारतीत शिरून दहशतवाद्यांशी केलेली कारवाई या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 3:42 pm

Web Title: box office collection of john abraham film batla house ssj 93
Next Stories
1 ‘काश्मीर भारताचाच भाग, उगाच नाक खुपसू नका’, पाकिस्तानी ट्रोलरला अदनानने सुनावले
2 सेक्रेड गेम्स २ : ‘त्या’ अभिनयामुळे स्मिताने मिळविली सैफची शाबासकी
3 वाढदिवसानिमित्त सैफची चाहत्यांना खास भेट, ‘लाल कप्तान’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X