26 February 2021

News Flash

बॉक्सऑफिसचे ‘तांडव’ नको!

चित्रपट आणि वेबमालिका या दोन्ही माध्यमांमध्ये असलेला फरकही याला कारणीभूत असल्याचे त्याला वाटते.

गेल्या काही महिन्यांत बॉलीवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शक मंडळी ओटीटीवर पदार्पण करती झाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत एरव्हीही हटके  चित्रपट देणारी अनुराग कश्यप, हंसल मेहतांसारखी दिग्दर्शक मंडळी असोत वा व्यावसायिकतेची समीकरणे साधत चांगले चित्रपट देणारी निखिल अडवाणीसारखे दिग्दर्शक असोत. या सगळ्यांनी हे नवमाध्यम आपलंसं के लं आहे. या यादीत नवीन भर पडली आहे ती दिग्दर्शक अली अब्बास जफरची. सलमान खानबरोबर सलग तीन सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अलीची ‘तांडव’ ही वेबमालिका अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. या वेबमालिके च्या निमित्ताने झालेल्या सोहळ्यात बोलताना अलीने पहिल्यांदाच हे सुपरहिट आणि बॉक्सऑफिस नामक पाठीवर असणारं जोखड बाजूला ठेवून मनाजोगतं काम करता आल्याबद्दल समाधान व्यक्त के लं आहे. तीन तासांच्या चित्रपटाबरोबर येणारा सुपरहिट की फ्लॉपचा ताण घेण्यापेक्षा वेबमालिके वरील आशयनिर्मितीचे स्वातंत्र्य खूप छान वाटते आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त के ली आहे.

अभिनेता सलमान खानला अपयशी चित्रपट मालिके तून बाहेर काढत सलग तीन सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून अलीचे पारडे बॉलीवूडमध्ये जड आहे. व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत राहूनही काही वेगळे देण्याचा त्याचा प्रयत्न असतो, अर्थात सलमान खानसारखा मोठा कलाकार तुमच्या चित्रपटात असेल तर बॉक्सऑफिसवरचे यश इतर कु ठल्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचं ठरतं. ‘मी सलग तीन चित्रपट सलमान खानबरोबर के ले आहेत. त्याच्यासारखा स्टार कलाकार असेल तर बॉक्सऑफिस नावाची गोष्ट तुमच्या खांद्यावरचं ओझं बनून येतेच. मी माझ्या मित्रांना सतत सांगतो आहे, महाविद्यालयात शिकत असताना मी अगदी निर्भयतेने रंगभूमीवर काम करत होतो. खूप आनंद वाटायचा मला तेव्हा नाटक दिग्दर्शित करताना… अगदी तोच आनंद मी आता डिजिटलसाठी ‘तांडव’ बनवताना घेतला. माझ्या स्वभावाशी अत्यंत प्रामाणिक राहत काही तरी चांगली कलाकृती निर्माण के ल्याचा आनंद मला मिळाला’, अशी भावना त्याने मनमोकळेपणाने व्यक्त के ली. चित्रपट आणि वेबमालिका या दोन्ही माध्यमांमध्ये असलेला फरकही याला कारणीभूत असल्याचे त्याला वाटते.

‘कोणत्याही कथाकारासाठी किं वा चित्रपटकर्मींसाठी वेबमाध्यम हे फार मुक्त व्यासपीठ आहे’, असं तो सांगतो. चित्रपट करताना तुम्हाला तुमची गोष्ट दोन तासांतच सांगावी लागते आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचे तिकीटबारीवरचे यश तुम्ही चित्रपट चांगला बनवला आहे की वाईट हे ठरवते. वेब माध्यमात मात्र तुम्ही निर्धास्तपणे काम करू शकता, असं तो म्हणतो आणि ‘तांडव’च्या निमित्ताने मोठ्या कलाकाराबरोबरची गणितं आणि तिकीटबारी या दोन्ही गोष्टींचं ओझं नव्हतं, याबद्दल खूश असल्याचं तो पुन्हा पुन्हा सांगतो.

‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘गुंडे’ अशा चित्रपटांपासून सुरुवात करणाऱ्या अली अब्बास जफरने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपले भक्कम स्थान निर्माण के ले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच तो मॉडेल अलिसियाशी विवाहबद्ध झाला आणि पाठोपाठ आठवड्याभराने ‘तांडव’मधून त्याचे वेबविश्वाातही पदार्पण झाले. एकाअर्थी बॉलीवूडमध्ये यश मिळवण्यासाठीची जी कडवी आव्हानं असतात ती त्याने यशस्वीरीत्या पेलली आहेत. तरीही बॉलीवूडपट आणि आर्थिक यशाचं समीकरण हे ओझं कायम तरुण दिग्दर्शकांना वागवावं लागतं. त्यासाठी ही तरुण फळी कं बर कसून काम करते आहे, हे जाणवल्याशिवाय राहात नाही.

‘खरं तर चित्रपटच करायचा होता… ’

‘तांडव’च्या कथेवर काम सुरू झालं होतं तेव्हा पहिले चित्रपट करायचा याच विचाराने चर्चेला सुरुवात झाली होती, असं अली स्पष्ट करतो. या चित्रपटाचा सहनिर्माता हिमांशू मेहरा याच्याशी झालेल्या चर्चेत ही कथा तीन तासांच्या चित्रपटात सांगता येणार नाही हे त्याला लक्षात आले होते. ‘हिमांशूशी कथेवरच चर्चा सुरू असताना कथा विस्तारतच गेली. त्याचा अवाका वाढला आणि मग त्यावर चित्रपट करता येणार नाही. मालिके सारखे मोठे स्वरूप असेल हे लक्षात आले. ‘सुलतान’ चित्रपट करत असतानाच माझी अ‍ॅमेझॉन प्राइमच्या अपर्णा पुरोहित यांच्याशी भेट झाली होती आणि त्यांच्यासमोर ‘तांडव’चा प्रस्ताव ठेवला होता. पुढे मागे करू या असे करत करत मी ‘टायगर जिंदा है’ पूर्ण के ला. पाठोपाठ ‘भारत’चे काम सुरू झाले होते. मात्र ‘भारत’ प्रदर्शित झाल्यानंतर आता काहीही करून ‘तांडव’चे काम सुरू करावे लागणार हे पक्कं  झालं आणि मग या वेबमालिके ची तयारी सुरू झाली’, असं त्याने सांगितलं. ‘तांडव’ची कथा ही सत्ताकारणाभोवती फिरणारी आहे. राजकीय कथेवरचे चित्रपट वा वेबमालिका हेही एक वेगळं आव्हान असतं, मात्र ‘तांडव’मध्ये मांडण्यात आलेली कथा ही वैश्विाक आहे, असं तो म्हणतो. ‘विषय कोणताही असो चित्रपट करताना मी कायम व्यावसायिक समीकरणं लक्षात घेऊनच काम करतो. आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा माझा आग्रह असतो. आणि राजकारण हा तर कोण्या एका देशाचा नाही तो जगाचा विषय आहे. त्यामुळे व्यावसायिक चौकटीतून विचार करण्याच्या माझ्या क्षमतेचा मी पुरेपूर उपयोग करून घेत हा चित्रपट के ला आहे’, असंही तो सांगतो. राजकारण घडत असताना तुम्ही शांतपणे बघत राहू शकत नाही, किं बहुना तुम्ही राजकीय नाही असं ठामपणे सांगणं हेही एकाअर्थी तुम्ही राजकारणाबद्दल ठाम भूमिका घेण्यासारखंच आहे, याकडेही तो लक्ष वेधतो. सत्ता मिळवण्यासाठी त्याबद्दल महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या व्यक्ती हरएक पद्धतीने चाली खेळत असतात आणि सत्ताकारणाचा हा खेळ कु ठल्याही देशात वेगळा नसतो. तो सगळीकडे सारखाच असतो आणि त्या अर्थाने ‘तांडव’चा विषय हा जगभरात सगळ्यांनाच पाहायला आवडेल, असा विश्वासही अलीने व्यक्त के ला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:02 am

Web Title: boxoffice anurag kashyap hansal mehta is one of the most popular bollywood directors in ott hindi films akp 94
Next Stories
1 कमी वयाचा पार्टनर असल्यामुळे नात्यात फरक पडतो का? मिलिंद म्हणतो…
2 ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत म्हणाला…
3 आर्याचा मृत्यू अटळ? विराटने आखली ‘ही’ योजना
Just Now!
X