News Flash

प्रियांका- निकच्या उत्पन्नाचा आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

प्रियांकाच्या तुलनेत निकच्या उत्पन्नाचा आकडा हा जास्त असल्याचं लगेचच लक्षात येत आहे.

nick jonas , priyanka chopra
प्रियांका चोप्रा, निक जोनास, nick jonas , priyanka chopra

सौंदर्यस्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रियांका चोप्राचा प्रवास आता यशाच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. सुरुवातीला ‘क्वांटिको’ या सीरिजच्या माध्यमातून तिने परदेशी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर हॉलिवूडपटांमधूनही ती झळकली. प्रियांकाच्या अदा आणि तिचा एकंदर अंदाज पाहून गायक निक जोनासही तिच्यावर भाळला. गेल्या काही काळापासून निक आणि प्रियांका रिलेशनशिपमध्ये असून, त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचंही कळत आहे.

कलाविश्वात या दोघांचं स्थान पाहता सध्या चर्चा होतेय ती म्हणजे येऊ घातलेल्या विवाहसोहळ्याची. अद्यापही प्रियांका किंवा निक या दोघांकडून कोणीच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, तरीही त्यांच्या लग्नाच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे. या साऱ्यामध्ये आणखी एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधत आहे ते म्हणजे या दोघांचं वार्षिक उत्पन्न. कलाविश्वात नावाजलेल्या या दोघांच्याही उत्पन्नाचा आकडा सध्या सर्वांनाच थक्क करुन जात आहे. फोर्ब्सच्या यादीत नमूद केल्याप्रमाणे प्रियांकाच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा ७५,४६,५५,००० रुपये इतका आहे. तर निकच्या गेल्यावर्षीच्या उत्पन्नावर नजर टाकली असता हा आकडा १,७१,४८,७५,००० रुपये इतका आहे. या दोघांचंही एकत्रित उत्पन्न पाहिलं तर ही रक्कम २,४६,९७,८०,००० रुपयांवर पोहोचत आहे.

Sacred Games : नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, ‘कुक्कू’ खरंच ट्रान्सजेंडर आहे का?

प्रियांकाच्या तुलनेत निकच्या उत्पन्नाचा आकडा हा जास्त असल्याचं लगेचच लक्षात येत आहे. काही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार निक एका शोसाठी जवळपास २ कोटी रुपये इतकं मानधन घेतो. त्याच्याकडे २०० कोटींहून अधिक किमतीची संपत्ती असून, त्याचे स्वत:चे एकूण चार बंगले आहेत. महागड्या गाड्यांच्या कलेक्शनचीही यात भर आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही निकचा समावेश होतो. त्यामुळे फक्त कलेमुळेच नव्हे, तर संपत्तीमुळेही हे सेलिब्रिटी कपल चर्चेचा विषय ठरत आहे, असंच म्हणावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 12:24 pm

Web Title: boyfriend singer nick jonas is richer than his girlfriend actress priyanka chopra
Next Stories
1 जाणून घ्या कोण आहे ‘अडल्ट स्टार’ शकीला, का होत आहे तिची चर्चा?
2 नेहाला मिळाला ‘हा’ धक्कादायक अनुभव
3 Sanju box office collection Day 32: ‘संजू’नं ‘टायगर’वर केली मात
Just Now!
X