24 April 2019

News Flash

Video : ‘हाईट छोटा आहे पण फाईट मोठी आहे’ म्हणत ‘बॉईज २’चा ट्रेलर प्रदर्शित

येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला 'बॉईज २' हा सिक्वेल'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या चित्रपटातील ‘आम्ही लग्नाळू’ या गाण्याने तरुणाईला तुफान वेड लावलं होतं. त्यामुळे तिच धम्माल मस्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी चित्रपटाची टीम सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘बॉईज २’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला ‘बॉईज २’ हा सिक्वेल’बॉईज’गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईतील लोअर परेल येथे प्रदर्शित झाला आहे.

‘बॉईज २’ या नावामुळेच अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाददेखील आपल्याला पाहायला मिळते.

दरम्यान, ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील यात भूमिका असल्याचे कळून येते.

First Published on September 19, 2018 2:29 pm

Web Title: boys 2 trailer launch release