News Flash

विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिट पहिल्यांदाच अँजेलिनाच्या घरी; दोन तास घालवले एकत्र

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली, हॉलीवूडमधलं एक गोल्डन कपल. ती दोघं, त्यांची स्वत:ची मुलं आणि वेगवेगळ्या देशांतून दत्तक घेतलेली मुलं असं एक भलंमोठं, विलक्षण कुटुंब. कुणालाही हेवा वाटावं असं. सतत मीडियामध्ये त्यांचे एकमेकांबरोबरचे आणि मुलांबरोबरचे हसरे फोटो. एका आदर्श, सुखी कुटुंबाचं चित्र. मात्र २०१६ मध्ये दोघांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं होतं. दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्याच्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच ब्रॅड पिटला अँजेलिनाच्या घरी पाहिलं गेलं. अँजेलिनाच्या घरी दोन तास राहिल्यानंतर ब्रॅड पिट दुचाकीवरून निघाला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी ब्रॅडने अँजेलिनाची भेट घेतली. या दोघांची घरं एकमेकांपासून १० मिनिटांच्या अंतरावरच आहेत. मात्र ही भेट कशाबद्दल झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

‘वॅनिटी फेअर’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रॅडबद्दल अँजेलिना म्हणाली होती की, ‘आम्हा दोघांनाही एकमेकांची काळजी आहे. तशीच काळजी आम्हाला आमच्या कुटुंबाचीही आहे. आम्ही दोघंही एकाच ध्येयाच्या दिशेने जात आहोत. घटस्फोट ज्या कारणांमुळे घ्यावा लागला त्या गोष्टी पचवणं आमच्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं. घटस्फोट घेतल्यावर ते घाव भरून आले असंही नाही. आयुष्य जसं पुढे जातंय त्यातून आम्हाला त्या घावांचा विसर पडतोय.’

सप्टेंबर २०१६ मध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २००४ पासून हे कपल एकत्र राहत होते. २०१४ मध्ये ब्रॅन्जेलिनाने लग्न केले असून दोन वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना सहा मुलं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:48 pm

Web Title: brad pitt spotted at angelina jolie house for the first time since split spent 2 hours with her ssv 92
Next Stories
1 …तेव्हा झहीरच्या पत्नीसाठी कार्तिकने बॅरिकेट्सवरुन मारली होती उडी
2 विठू नामाच्या गजरात एकरूप होण्यासाठी झी टॉकीजवर खास कार्यक्रम!
3 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘लूटकेस’, पण या कारणामुळे कुणाल खेमू नाराज
Just Now!
X