News Flash

ब्रॅड पीटने लग्नाचं अमिष दाखवून फसवलं; महिलेने दाखल केली तक्रार

लग्नाचं आमिश दाखवून अभिनेत्यानं केली लाखोंची फसवणूक; महिलेनं ठोकला लाखोंचा दावा

हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पीटवर अमेरिकेतील एक महिलेने आर्थिक फसवणूकीचे आरोप केले आहेत. किली ख्रिस्टीना असं या महिलेचं नाव आहे. ब्रॅडने लग्नाचं आमिश दाखवून मला ४० हजार अमेरिकी डॉर्सचा गंडा घातला असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने निव्वळ आरोपच केलेले नाहीत तर ब्रॅडविरोधात तब्बल एक लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४ लाख रुपयांचा दावा ठोकला आहे.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

किली ख्रिस्टीना टेक्सासमधील एका स्वयंसेवी संस्थेची कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी या संस्थेच्या एका चॅरिटी इव्हेंटमध्ये ब्रॅडसोबत तिची मैत्री झाली. अन् पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यावेळी ब्रॅडने किलीला लग्नाचं वचन दिलं होतं. शिवाय एका संस्थेला दान करण्याच्या निमित्ताने तिच्याकडून ४० हजार डॉलर्स उसणे घेतले होते. हे पैसे अद्याप ब्रॅडने परत केलेले नाहीत. शिवाय तो लग्न करण्यासही टाळाटाळ करत आहे असे खळबळजनक आरोप ख्रिस्टीनाने केले आहेत.

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

मात्र हे सर्व आरोप ब्रॅट पीटने फेटाळून लावले आहेत. “मी किलीला ओळखतो. पण मी तिचा मित्र वगैरे नाही. मी तिच्याकडून कधीही ४० हजार डॉलर्स उसणे घेतले नव्हते. तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे.” असं स्पष्टीकरण ब्रॅड पीटने दिलं. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. जर या प्रकरणात ब्रॅड दोषी सिद्ध झाला तर आर्थिक फसवणूकीच्या आरोपाखाली त्याला तब्बल १० वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:04 pm

Web Title: brad pitt sued for 1 lakh dollars by a texas women mppg 94
Next Stories
1 Video: ‘तारक मेहता…’मधील जेठालालला भेटली नवी दया
2 अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर करणी सेनेचा धमाका; पाठवली कायदेशीर नोटीस
3 लग्नात नेहाने केलं प्रियांका, अनुष्काला कॉपी? स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
Just Now!
X