15 August 2020

News Flash

सगळ्या खिडक्या फोडा; सत्या नाडेलांच्या विधानावरून अभिनेत्याचा टोला

'सीएए'वर सत्या नाडेला नाराज

देशात लागू झालेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारतात जे काही सुरू आहे. ते वेदनादायी आहे, असं नाडेला यांनी म्हटलं होतं. त्यावर काहींनी नाराजी व्यक्त केली. तर रंग दे बसती फेम अभिनेता सिद्धार्थ यांने उपरोधिक सल्ला दिला आहे.

देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला आहे. याविरोधात आंदोलनंही सुरू असून, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही या कायद्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नाडेला यांच्या भूमिकेवर वेगवेगळी मत होत आहेत.

रंग दे बसती फेम दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने थट्टा करत अप्रत्यक्षरित्या भाजपाला डिवचले आहे. सिद्धार्थनं ट्विट रिट्विट करत “ते (सत्या नाडेला आणि मायक्रोसॉफ्ट) देशविरोधी आहेत. त्यामुळे सगळ्या खिडक्या फोडा,” असा उपरोधिक टोला लगावला आहे.

सत्या नाडेला काय म्हणाले होते ?

मायक्रोसॉफ्टच्या मॅनहॅटन येथील कार्यक्रमात सत्या नाडेला यांनी बोलताना नाडेला म्हणाले, ““माझ्या मते भारतात सध्या जे काही सुरु आहे ते दु:खद आहे. परिस्थिती वाईट आहे. मला बांगलादेशमधून भारतात आलेला व्यक्ती भारतात एखादी कंपनी सुरु करताना किंवा थेट इन्फोसिसचा पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून पहायला आवडेल.” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ‘बझफीड’चे संपादक बेन स्मिथ यांनी ही मुलाखत घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 1:30 pm

Web Title: break all the windows actor siddharth reaction on satya nadella statement bmh 90
Next Stories
1 तैमुरमुळे सैफ-करीना झाले मालामाल; केला इतक्या कोटींचा करार
2 Oscar 2020 : नायक नव्हे खलनायकाचा दबदबा; ‘जोकर’ला ११ नामांकनं
3 ..म्हणून शाहरुखने ‘करण-अर्जुन’ प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांची मागितली माफी
Just Now!
X