18 November 2017

News Flash

‘बाहुबली’ला अशी हवी वधू

ही जाहिरात वाचून तुम्हीही लिहिणाऱ्याच्या कल्पकतेचं कौतुक कराल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 19, 2017 7:10 PM

‘बाहुबली २’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. जगभरात या सिनेमाने १३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा सिनेमा जेवढा हिट झाला तेवढेच त्यातले कलाकारही प्रसिद्ध झाले. प्रभास तर कित्येक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. प्रभाससारख्या मुलाशीच लग्न व्हावे अशी अपेक्षा आता तरुणी करत आहेत. म्हणूनच की काय प्रभासला ६००० मुलींच्या लग्नाच्या मागण्या आल्या होत्या. पण त्याने यातला एकही प्रस्ताव स्वीकारला नाही.

प्रभाससाठीचं क्रेझ पाहून चक्क भल्लाल देवने म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीने गेल्यावर्षी बाहुबलीसाठी योग्य मुलगी हवी म्हणून जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून तुम्हीही लिहिणाऱ्याच्या कल्पकतेचं कौतुक कराल एवढं मात्र नक्की. या जाहिरातीत प्रभासच्या अंगी असणारे गुण दाखवले आहेत. प्रभासला टॅटूही बनवता येतो आणि त्याचे आई देवसेनेवर प्रेम आहे हे मुद्देही मांडले.

काय आहे जाहिरातः

बाहुबलीसाठी वधू हवी. सुयोग्य वधूसाठीच्या अटी.

तिला जंगल, डोंगर आणि हिमस्खलन सहज चढता यायला पाहिजे. याच बरोबर ती तलवारबाजीत आणि तिरंदाजीत निपूण असली पाहिजे. या जाहिरातीला २०१६ मध्ये मजेशीर जाहिरात म्हणून नामांकनही मिळालं होतं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने त्याच्या काकांना म्हणजे तेलगु अभिनेते कृष्णम राजू यांना २०१६ च्या अखेरपर्यंत लग्न करणार असल्याचे वचन दिले होते. सध्या तेलगु सिनेसृष्टीतला मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून सध्या प्रभासकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आता या जाहिरातीमधील अटी बघून अनेक मुलींनी प्रभासकडे लग्नाची मागणी जरी घातली असेल तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, सध्या फक्त प्रभासचीच चलती आहे.

First Published on May 19, 2017 6:50 pm

Web Title: bride for baahubali you ll die laughing after reading rana daggubatis hilarious matrimonial ad