अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींना कोठडीसाठी न्यायालयात आणू नये. त्यांना दूरचित्रसंवादामार्फत (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) हजर करावे,  असे निर्देश मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी तपास यंत्रणांना दिले.

करोनाचे संकट आणि कायदा—सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. याप्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपींची प्रतिजन चाचणी करण्याचे आदेशही न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले आहेत.  मुख्य महानगरदंडाधिकारी एस. टी. दंडे यांनी सोमवारी याबाबतचा दोन पानी आदेश दिला.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे.