News Flash

ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत

राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातून ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर्ट

| July 1, 2013 11:50 am

राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातून ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आर्ट मलिकने मिल्खा यांचे वडिल संपूर्ण सिंगची भूमिका केली आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याने काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये ट्रू लाइज, सेक्स अॅण्ड सिटी २, सिटी ऑफ जॉय, पॅसेज टू इंडिया, ज्वेल इन द क्राउन या चित्रपटांचा समावेश आहे.
“ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये इंग्रजी बोलणा-या भारतीय वर्ण असलेल्या व्यक्तिची भूमिका नेहमी करत आलो. मला मातृभाषेचा वापर भारतीय चित्रपटांसाठी करण्याची इच्छा होती. पण अनेक वर्षे झाले माझी ही इच्छा अपूर्णच होती”, असे मलिक एका वक्तव्यात म्हणाले. ज्यावेळेस मेहरा यांनी सदर भूमिकेसाठी मलिकला विचारले त्यावेळेस त्यांना फार आनंद झाल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2013 11:50 am

Web Title: british actor art malik plays milkha singhs dad in biopic
Next Stories
1 बंगाली साहित्यावर चित्रपट करण्यास मधुर भांडारकर उत्सुक
2 अमिताभ बच्चननी आराध्याला नेले चाह्त्यांच्या भेटीस
3 ‘सत्याग्रह’ ३० ऑगस्टला चित्रपटगृहात
Just Now!
X