News Flash

ब्रिटिश बालकलाकार एबीगेल एम्स ‘शिवाय’मध्ये

‘शिवाय’ हा अजयचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा असा चित्रपट आहे.

ब्रिटिश बालकलाकार एबीगेल एम्स ‘शिवाय’मध्ये

दिग्दर्शक म्हणून आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या ‘शिवाय’च्या तयारीत गुंतलेला अभिनेता अजय देवगण पुढच्या महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. शिवासारखे गुण असणारा नायक म्हणून ‘शिवाय’ अशी आणि एवढीच थोडक्यात ओळख करून देणाऱ्या अजयने आपल्या या चित्रपटाबद्दलचे सगळे तपशील कमालीचे गुप्त ठेवले आहेत. त्यामुळे चित्रपटाची कथा काय हे कळले नसले तरी या चित्रपटात अजय पुन्हा एकदा वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे हे निश्चित झाले आहे. ब्रिटिश बालकलाकार एबीगेल एम्सची ‘शिवाय’ या चित्रपटात अजयच्या मुलीच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे.

‘शिवाय’ हा अजयचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा असा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून संपूर्ण चित्रीकरण बर्फाळ प्रदेशात करावे लागणार आहे. याच कारणास्तव अजयने बल्गेरियाची निवड केली असून हा चमू लवकरच तिथे रवाना होईल. अजय देवगण स्वत: यात मुख्य भूमिकेत असून एबीगेल त्याच्या मुलीच्या गौराच्या भूमिकेत दिसणार आहे. एबीगेल हे नाव हॉलीवूडसाठी नवीन नाही. तिने हॉलीवूडपटांमधूनही भूमिका केल्या आहेत आणि इंग्लिश टेलिव्हिजनवर तिने बऱ्याच मालिकांमधून काम केले आहे. ‘लॉलेस’, ‘हॅरी अ‍ॅण्ड पॉल्स स्टोरीज ऑफ २’, ‘अलीकेट्स’, ‘डॉक्टर’ अशा मालिकांमधून तिने काम केले असून ‘डॉक्टर’ मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून दिग्दर्शक कबीर खानने जगभर फिरून ऑडिशन्स घेतल्या होत्या, तेव्हा कुठे त्याला हर्षांलीसारखी छोटी कलाकार मिळाली. आता ‘शिवाय’साठी अजय देवगणची टीम थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचली असून ही नवी बाप-बेटीची जोडी पडद्यावर कशी दिसेल, याची उत्सुकता अजयच्या चाहत्यांना असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2015 3:59 am

Web Title: british child actor abigail eames to play ajay devgns daughter in shivaay
Next Stories
1 स्मिता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा: ‘रीमेंबरिंग स्मिता’!
2 ‘बिग बॉस’मधील अंकित गेराच्या सहभागाने विशेष फरक पडणार नाही’
3 राजपाल यादव ‘जिलेबीवाला’च्या भूमिकेत
Just Now!
X