अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या निवडणूकीच्या प्रचारासाठी ‘द रोलिंग स्टोन्स’ या ब्रिटिश रॉक बँडच्या गाण्यांचा वापर करत आहेत. मात्र या गाण्यांचा वापर त्वरित थांबवावा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा धमकीवजा इशारा या ब्रिटिश रॉक बँडने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

अवश्य पाहा – अखेरच्या काळात पंचमदांना काम का मिळालं नाही?; जावेद अख्तर म्हणाले…

अवश्य पाहा – “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली

‘द रोलिंग स्टोन’ हा युरोपमधील एक नामांकित रॉक बँड आहे. हा म्युझिक ग्रुप जवळपास १९६२ पासून कार्यरत आहे. या बँडने आतापर्यंत ‘स्टार्ट मी अप’, ‘जिमी शेल्टर’, ‘लिव्हिंग इन अ घोस्ट टाऊन’, ‘लेडी जेन’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या या लोकप्रिय गाण्यांचा वापर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारासाठी करत होते. परिणामी ‘द रोलिंग स्टोन बँड’ने नाराजी व्यक्त केली आहे. या बँडच्या प्रवक्त्यांनी डेडलाईनला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी वजा इशारा दिला आहे. त्यांनी रोलिंग स्टोनच्या गाण्यांचा वापर त्वरित थांबवावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. शिवाय सध्या केवळ इशारा म्हणून एक नोटिस ट्रम्प यांना पाठवण्यात आली आहे.