सर्कस, इन द झोन, ब्लॅक आऊट यासारख्या अनेक जगभरात प्रसिद्ध झालेली अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स आपल्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणूकीचे आरोप केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय. त्यानंतर आता तिने आपल्या संपत्तीवरील वडिलांचं पालकत्व काढून घेण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. यात तिने आपल्या संपत्तीवरील वडिलांचं नियंत्रण काढून घेण्यासाठी याचिका दाखल केलीय. नुकतंच अभिनेत्री ब्रिटनीला नवीन वकिलांची निवड करण्याचा अधिकार मिळाला. त्यानंतर ब्रिटनीचे नवीन वकील मैथ्यू रोसेनगार्ट यांनी याचिका दाखल करत तिच्या वडिलांचं पालकत्वच काढून घेण्याची मागणी केलीय.

ब्रिटनी स्पिअर्सचे वडील जेमी स्पिअर्स यांनी 2007 मध्ये कोर्टाच्या रीतसर बाबींची पूर्तता करून घेतलेल्या अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्सची कॉन्जरवेटरशिप मिळावली होती. या कॉन्जरवेटरशिपमधून मुक्तता मिळावी यासाठी तिने यापूर्वी अनेक प्रयत्न केले होते. याप्रकरणात अनेक खुलासे करत वडिलांनी घेतलेल्या कॉन्जरवेटरशिपमुळे त्रास होत असल्याचं सांगत न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या 12 वर्षात याने मला खूप त्रास झाला आहे. माझे वडील याला कारणीभूत आहेत. माझ्या अत्यंत व्यक्तिगत गोष्टींचे निर्णयही मला घेता आले नाहीत. हा त्रास पाहता मला माझ्या वडिलांना तुरूंगात डांबलं पाहिजे, असं देखील तिने म्हटलं होतं. यासाठी तिने न्यायालयात याचिका दाखल करत कॉन्जरवेटरशिपमधून मुक्तता मिळावली यासाठी खटला सुरू होता. यात न्यालयाने तिची ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर नवीन वकीलाची नियुक्ती करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर ब्रिटनीने पुन्हा एकदा न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. तिच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवू पाहणाऱ्या वडिलांचं आपल्या संपत्तीवरील पालकत्व काढून टाकण्याची मागणी तिने केलीय.

आणखी वाचा : Viral Video: सोनू सूदने सुरू केला पंजाबी ढाबा; म्हणाला, “साहेब चपाती तयार आहे…”

ब्रिटनीचे वकील मैथ्यू रोसेनगार्ट यांनी लॉस एंजेलिसच्या उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केलीय. ब्रिटनीच्या संपत्तीवरील वडील जेमी स्पिअर्स यांचे पालकत्व काढून टाकण्यात यावेत, तसंत तिच्या संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी वडिलांऐवजी वुडलॅंड हिल्समधील सर्टिफाइड सीपीए जेसन रुबिन यांना ती जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय. वडील जेमी स्पिअर्स तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. एका खासगी कंपनीच्या मदतीनं ही आर्थिक फसवणूक केली जात आहे, असा खळबळजनक आरोप ब्रिटनीने केला आहे.

ब्रिटनीच्या या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फ्री ब्रिटनी असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ब्रिटनीचं सुरू असलेलं हे प्रकरण म्हणजे सोनेरी कारकिर्दीला लागलेलं काळं ग्रहण मानलं जातं.