News Flash

अतिउत्साह नडला; नाचता नाचता ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पाय मोडला

नाचता नाचका तिच्यासोबत हे काय घडले?

ब्रिटनी स्पीयर्स हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायीका म्हणून ओळखली जाते. तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. यावेळी तिचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डान्स करताना ब्रिटनीचा चक्क पायच फ्रॅक्चर झाला आहे.

कुठल्या डान्स स्टेपमुळे पाय झाला फ्रॅक्चर?

ब्रिटनी तिच्या ‘बेबी वन मोर टाईम’ या गाण्यावर डान्स करत होती. खरं तिला अनेक महिन्यांनंतर डान्स करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ती अगदी बेभान होऊन नाचत होती. नाचत असताना कथ्थक या नृत्यप्रकाराप्रमाणे ती गोल गोल फिरु लागली. इतक्याच तिचा पाय घसरला. परिणामी तिच्या टाचेला गंभीर दुखापत झाली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आता पुढचे सहा महिने तिला आधाराशिवाय चालताही येणार नाही. अशा प्रकारे अतिउत्साह ब्रिटनीच्या अंगाशी आला आहे.

ब्रिटनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा एकदा डान्स करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:23 pm

Web Title: britney spears shares video of dance that broke her foot mppg 94
Next Stories
1 पॉर्नस्टार होताच दिग्दर्शकाच्या मुलीला पोलिसांनी केली अटक
2 पहिल्यांदाच जेम्स बॉन्ड बोलणार मराठी
3 “ती समाजात द्वेश पसरवतेय…”; स्वरा भास्कर विरोधात कोर्टात याचिका
Just Now!
X