30 November 2020

News Flash

‘या शेफशी पंगा घेऊ नका, अन्यथा…’; पाहा वाऱ्याच्या वेगाने नानचक चालवणारा कुगफू शेफ

VIDEO: या कुंगफू शेफचा वेग पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क...

कुंगफू मास्टर ब्रूस ली हा मार्शलआर्टच्या दुनियेतील एक बेताज बादशाह म्हणून ओळखला जायचा. आपल्या अनोख्या फाईटिंग शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा ब्रूस आज आपल्यात नाही. परंतु ऑनलाईन व्हिडीओज, फोटो आणि चित्रपटांच्या माध्यमातून तो मृत्यूनंतरही प्रेक्षकांमध्ये तितकाच चर्चेत असतो. नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका कुंगफू शेफचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या शेफचा नानचाक चालवण्याचा वेग पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

 

View this post on Instagram

 

Monday Tip: Don’t F with The Chef by @fitness_workout_nation #BruceLee

A post shared by Bruce Lee (@brucelee) on

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

ब्रूस लीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याची मुलगी शेनॉन ली विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. नुकतेच तिने ब्रूस ली प्रमाणेच नानचाक चालवणाऱ्या एका कुंगफू शेफचा व्हिडीओ शेअर केला आहे. जेवण करण्यात पटाईत असलेला हा शेफ फाईटिंगमध्येही तितकाच तरबेज आहे. डोळ्यांची पाती लवते ना लवते तोच एखाद्यावर हल्ला करण्याची क्षमता या शेफमध्ये आहे. त्याने काही सेकंदामध्येच आपल्या अफाट क्षमतेचं प्रदर्शन केलं. त्याचा हा अनोखा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:17 pm

Web Title: bruce lee kung fu chef video viral mppg 94
Next Stories
1 ‘प्यार हुआ इक़रार हुआ…’; टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा
2 Exclusive : मालिका पुढे चालवायची म्हणून अशा नराधमांना पाठिशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड
3 नसीरुद्दीन शाह यांच्या मुलाला करोनाची लागण
Just Now!
X