News Flash

करोनासाठी चीनला दोषी ठरवणं पडलं महागात; गायकाने मागितली माफी

करोनामुळे या गायकाचा स्टेज शो रद्द झाला होता.

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूची निर्मिती चीनमधील वुहान येथे झाली होती. त्यामुळे करोना विषाणूच्या प्रादुर्भावासाठी प्रसिद्ध गायक ब्रायन अॅडम्स याने चीनमधील खाद्य संस्कृतीला दोषी ठरवले होते. त्यांनी वटवागुळं खाल्ली म्हणून जगाला करोनाचा त्रास होत आहे, असं त्याने म्हटलं होतं. परंतु या वक्तव्यासाठी आता त्याने माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

CUTS LIKE A KNIFE. A song by me. Tonight was supposed to be the beginning of a tenancy of gigs at the @royalalberthall, but thanks to some fucking bat eating, wet market animal selling, virus making greedy bastards, the whole world is now on hold, not to mention the thousands that have suffered or died from this virus. My message to them other than “thanks a fucking lot” is go vegan. To all the people missing out on our shows, I wish I could be there more than you know. It’s been great hanging out in isolation with my children and family, but I miss my other family, my band, my crew and my fans. Take care of yourselves and hope we can get the show on the road again soon. I’ll be performing a snippet from each album we were supposed to perform for the next few days. #songsfromisolation #covid_19 #banwetmarkets #selfisolation #bryanadamscutslikeaknife #govegan

A post shared by Bryan Adams (@bryanadams) on

ब्रायन अॅडम्स एप्रिल महिन्यात लंडनमध्ये एक स्टेज शो करणार होता. गेल्या वर्षभरापासून तो या स्टेज शोची तयारी करत होता. परंतु करोना विषाणूमुळे हा शो रद्द झाला आहे. परिणामी त्याला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे संतापलेल्या ब्रायनने चीनला दोषी ठरवले. चाकूने जसं ते वटवाघूळ कापतात तसं त्यांनी माझ्या स्टेज शोचे दोन तुकडे केले अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट त्याने केली होती.

या इन्स्टा पोस्टमुळे ब्रायनवर प्रचंड टीका करण्यात आली. त्याला रेसिस्ट म्हणून हिणवण्यात आलं. सातत्याने होणाऱ्या टीकेला वैतागून अखेर ब्रायनने माफी मागितली आहे. माफी मागण्यासाठी त्याने आणखी एक इन्स्टा पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी उघडपणे करोना विषाणूसाठी चीनला दोषी ठरवलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर करोनाला चिनी व्हायरस असं म्हटलं होते. भातरातून अभिनेता केआरके याने देखील करोनासाठी चिनी खाद्यसंस्कृतीला दोषी ठरवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:01 pm

Web Title: bryan adams apologises for coronavirus tirade mppg 94
Next Stories
1 प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच 46 व्या वर्षी जतीन कणकियांने घेतला होता जगाचा निरोप
2 “खरंच आपण करोनावर औषध शोधलं का?”; विशालचा मोदींना प्रश्न
3 सहा वर्षानंतर अभिनेत्रीचा झाला ब्रेकअप, म्हणाली आम्ही…
Just Now!
X