29 May 2020

News Flash

शेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच अजय देवगनच्या चित्रपटात झळकणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘द बिग बुल’ असे असुन त्याचे दिग्दर्शन कूकी गुलाटी करणार आहे. अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. “एका नवीन प्रवासाला सुरुवात करत असुन, मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.” अशी पोस्ट अभिषेकने केली आहे. या चित्रपटात अभिषेकबरोबर अभिनेत्री इलियाना डिक्रूज देखील दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

Here we go! A new journey, a new beginning. Need your best wishes. @ajaydevgn #KookieGulati @anandpandit

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

‘द बिग बुल’ची पटकथा १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारित आहे. अजय देवगन आणि अभिषेक बच्चन यांनी याआधी २०१२ साली प्रदर्शीत झालेल्या बोल बच्चन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी याने केले होते. ‘द बिग बुल’ या चित्रपटाच्या निमित्ताने आत पुन्हा एकदा अभिषेक व अजय देवगन एकत्र काम करताना दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 5:20 pm

Web Title: bse sensex abhishek bachchan ajay devgn mppg 94
Next Stories
1 माझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर
2 जेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा ‘विक्रम लँडर’ सापडला का?
3 राधिका आपटे दिसणार ‘अॅपल’च्या सीरिजमध्ये
Just Now!
X