01 December 2020

News Flash

शाहरुख ठरला बुर्ज खलिफावरचा ‘किंग’; फोटो पाहून व्हाल थक्क

दुबईतही शाहरुखच्या वाढदिवसाचा जल्लोष

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने नुकताच त्याचा वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. अगदी वृत्तवाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत सर्व ठिकाणी शाहरुखचीच चर्चा होती. दरम्यान शाहरुखचा वाढदिवस दुबईमध्ये देखील मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर शाहरुखसाठी विशेष रोषणाई करण्यात आली असून याचा एक फोटो शाहरुखने शेअर केला आहे.

शाहरुख खानचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोषणाई करत बॉलिवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. विशेष म्हणजे शाहरुख हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे, ज्याचे नाव या इमारतीवर लिहिले गेले.

“जगातल्या सगळ्यात उंच मोठ्या स्क्रीनवर स्वत:चं छायाचित्र झळकताना पाहणं हा खरंच हा सुंदर क्षण असतो. माझे मित्र मोहम्मद अलावर (Developer of Burj Khalifa and the Dubai Mall) यांनी माझ्या आगामी चित्रपटापूर्वीच ही मोठी स्क्रीन भेट म्हणून दिली. धन्यवाद बुर्ज खलिफा आणि दुबई, माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल”, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सोमवारी शाहरुखने त्याचा ५५ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यामुळे सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्याला विविध माध्यमातून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 8:43 am

Web Title: burj khalifa lights up with wishes for shah rukh khan on his 55th birthday ssj 93
Next Stories
1 उत्तर प्रदेशमध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’ला तुफान प्रतिसाद; बॉक्स ऑफिसवरही सुसाट
2 ‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..?
3 संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन
Just Now!
X