12 July 2020

News Flash

दिल्लीतील व्यावसायिकाने केला ईशा गुप्तावर मानहानीचा दावा

ईशाने ट्विटरच्या माध्यमातून या व्यावसायिकावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता

ईशा गुप्ता

विविध कारणासाठी सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ता एका वादात अडकली आहे. दिल्लीस्थित एका व्यावसायिकाने ईशाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. रोहित विग असं खटला दाखल करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे. काही दिवसापूर्वी ईशाने ट्विटरच्या माध्यमातून या व्यावसायिकावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर आता या व्यावसायिकाने तिच्याविरोधात साकेत न्यायालयात खटला दाखल केला आहे.

“ईशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याविरोधात चुकीचं ट्विट केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. माझ्या मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या ट्विटमुळे माझी प्रतिमा मलीन करण्यात आली आहे”, असं रोहितने म्हटलं आहे.

काही दिवसापूर्वी ईशाने ट्विटरच्या माध्यमातून रोहितने आपल्याकडे वाईट नजरेने पाहिल्याचं म्हटलं होतं. या व्यक्तीने मला स्पर्श केला नाही, मात्र तो माझ्याकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत होता. त्याच्याकडे पाहून महिला अजूनही असुरक्षित आहेत, स्त्री म्हणून जन्माला येणं खरंच पाप आहे का ? असं ट्विट ईशाने केलं होतं.

 दरम्यान, ईशाच्या या ट्विटनंतर आपण ईशासोबत कोणतेही गैरवर्तन केले नसून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं रोहितने म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2019 1:41 pm

Web Title: businessman files criminal defamation complaint against esha gupta ssj 93
Next Stories
1 मिशन मंगलचा ट्रेलर पाहून इस्रोने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
2 ‘तुला पाहते रे’च्या निरोपानंतर सुबोध भावे म्हणतो…
3 Bigg Boss Marathi 2 : जाणून घ्या, कोण आहे आरोह वेलणकर
Just Now!
X