News Flash

दिया मिर्झाकडे मधुचंद्रासाठी वेळ नाही!

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर साहिल संघा गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकले. हे नवपरिणीत जोडपे आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त आहे...

| November 17, 2014 03:49 am

dia-mirza759बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर साहिल संघा गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकले. हे नवपरिणीत जोडपे आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त आहे, की त्यांना अद्याप मधुचंद्र साजरा करण्यासाठी देखील वेळ मिळालेला नाही. दोघे केवळ एकमेकांचे जीवनसाथी नसून, व्यावसायिक भागीदारदेखील आहेत. ‘बॉर्न फ्री एन्टरटेन्मेंट’ नावाच्या निर्मितीसंस्थेचे ते मालक आहेत. २०११ साली स्थापन केलेल्या या निर्मितीसंस्थेद्वारे त्यांनी ‘लव्ह ब्रेकअपस् झिंदगी’ आणि ‘बॉबी जासूस’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली. लग्नानंतर नवपरिणीत जोडप्याने त्यांच्यात निर्माण झालेल्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी काही काळ एकमेकांबरोबर निवांतपणे घालविणे गरजेचे समजले जाते. परंतु, दिया आणि साहिल कामाच्या ठिकाणी मजेत वेळ घालवीत असल्याने, लग्नानंतर एकमेकांसाठी निवांत वेळ काढू न शकल्याबद्दल दियाची कोणतीही तक्रार नाही. याविषयी वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने मधुचंद्रासाठी वेळ काढणे गरजे असून, त्याविषयी जवळच्या आप्तेष्टांनी काळजीने विचारपूस करणे मी समजू शकते. आम्ही दोघे याबाबत विचार करत असलो, तरी सध्या साहिल आणि मी कामाच्या ठिकाणीच मजेत वेळ घालवत आहोत. आम्हाला कामाची आवड असल्याने इतक्यात मी सुटीवर जाण्याच्या विचारात नाही. नववधूला मिळत असलेल्या खास वागणुकीचा आनंद सध्या मी उपभोगत आहे. लग्नानंतरचा हा खूप सुखद काळ असल्याची असल्याची भावना दियाने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 3:49 am

Web Title: busy dia mirza has no time for honeymoon
Next Stories
1 टॉम क्रुझचे कोट्यवधींचे अलिशान घर विक्रीला
2 मी एक साधा माणूस! कोणालाही फसवत नाही, अथवा खोटं बोलत नाही – रणवीर सिंग
3 सर्जनशील विचारनिर्मितीचे व्यासपीठ
Just Now!
X