25 January 2021

News Flash

‘तापसीच माझी खरी चाहती’; कंगनाचा टोला

कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र आता कंगना नाही तर कंगनाच्या फॅन पेजने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कमेंट करत कंगनाने तापसीला टोला लगावला आहे.

एकेकाळी कंगनाची बहीण रंगोली चंडेलने तापसी पन्नूला ‘कंगनाची सस्ती कॉपी’ बोलली होती. या सगळ्यात आता कंगनाच्या चाहत्यांनी तापसीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोला कंगनाने कमेंट केली आहे. “हा हा हा मी खूश आहे, ही माझी खरी चाहती आहे. हीने संपूर्ण आयुष्य माझ्यावर अभ्यास करण्यासाठी समर्पित केले आहे. या सगळ्यामुळे मी निराश होणार नाही. श्री. बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक नक्कल माझीच केली जाते,” अशी कमेंट करत कंगनाने तापसीला टोला लगावला आहे.

दरम्यान, कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:28 pm

Web Title: by commenting on a photo kangana ranaut trolled taapsee for copying her dcp 98
Next Stories
1 नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर मौनीचे बोल्ड फोटो; नंतर मागितली माफी
2 ‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच सलमान झाला भावूक, पाहा व्हिडीओ
3 हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझानने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…
Just Now!
X