27 September 2020

News Flash

दिशा पटानीचा बिकिनीमधील ‘हा’ हॉट फोटो पाहून संतापले नेटकरी

अनेकांनी तिचा हा फोटो पाहून संताप व्यक्त केला आहे

disha patani trolled

‘बागी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा आणि टायगरची केमिस्टी असलेल्या ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून दिशाच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन सतत काही ना काही पोस्ट करणारी दिशा कायमच चर्चेत असते. मात्र नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टवरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर टिकास्र सोडले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या विरोध आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. अनेकांनी या कायद्याला विरोध केला आहे. या कायद्याविरोधात बॉलिवूडमधील काही कलाकारही मैदानात उतरले आहेत. फरहान अख्तरसारखे कलाकार प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले तर काहींनी सोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याला विरोध केला आहे. असं असतानाच दुसरीकडे दिशाने आपला एक बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. अनेकांना दिशाने पोस्ट केलेला हा फोटो खटकला आहे. एकीकडे देशामध्ये हिंसक आंदोलन होत असताना दुसरीकडे एखादी अभिनेत्रीने अशी पोस्ट करावी हे संतापजनक असल्याचे मत अनेकांनी दिशाच्या पोस्टवर कमेंट करुन म्हटले आहे. दिशाने गुरुवारी इन्स्ताग्रामवर बिकिनीमधील एक फोटो पोस्ट केला. यावर अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

#MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

“ही भाजपा सरकारची चाल असून सीएबी आणि एनआरसीवरुन तरुणांचे लक्ष्य विचिलीत करण्यासाठी पोस्ट करण्यात आली आहे,” असं एका युझरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने “एकीकडे देशामधील वातवरण तणावपूर्ण आहे तर दुसरीकडे तू अशा पोस्ट करण्यात व्यस्त आहेस,” असा टोला दिशाला लगावला आहे.

एकंदरीतच नेटकऱ्यांनी देशामध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना दिशाने अशाप्रकारे फोटो पोस्ट करण्याची काहीच गरज नव्हती असं मत नोंदवल्याचे चित्र दिसत आहे. दिशा मोहित सुरीच्या मलंग चित्रपटामध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 9:09 am

Web Title: caa protests disha patani trolled for posting picture in bikini amidst unrest in the country scsg 91
Next Stories
1 मोदी सरकारवर टीका करणे अनुराग कश्यपला पडले महागात?
2 मल्लिकाच्या ‘त्या’ मादक कृतीमुळे सलमानही लाजला
3 K.G.F 2: पुन्हा साम्राज्य निर्माण करणं सोप्प नाही, संजय दत्तनं शेअर केला पहिला पोस्टर
Just Now!
X