07 August 2020

News Flash

हॉटस्टारचं सबस्क्रीप्शन नसलेल्यांना पाहता येईल का सुशांतचा ‘दिल बेचारा’?

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' २४ जुलै रोजी (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलै रोजी (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर संध्याकाळी साडेसात वाजता सुशांतचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे प्रेक्षकांना हॉटस्टारवर मोफत म्हणजेच व्हीआयपी सबस्क्रीप्शन न घेता पाहता येणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाबडाने याविषयीची माहिती दिली. ‘देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा चित्रपट मोफत आहे याचा मला आनंद आहे’, असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टारचं व्हिआयपी सबस्क्रीप्शन वर्षभरासाठी ३९९ रुपये इतकी आहे. पण आता हे पैसे न भरताच प्रेक्षकांना सुशांतचा चित्रपट पाहता येणार आहे. नवीन प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांपैकी केवळ सुशांतच्याच चित्रपटाला ही सूट देण्यात आली आहे.

आणखी वाचा : सुशांतची ५० अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करणारी संजना आहे तरी कोण?

‘दिल बेचारा’मध्ये किझी आणि मॅनी या दोघांची प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 1:05 pm

Web Title: can dil bechara be watched without disney plus hotstar subscription ssv 92
Next Stories
1 ‘दिल बेचारा’च्या पॅकअपचा दिवस; सुशांतचा व्हिडीओ आला समोर
2 सोनू सूदच्या मदतीला विमानाचा वेग! किर्गिस्तानमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांना आणलं मायदेशी
3 ‘तेव्हा माझ्यावर देश सोडायची वेळ आलेली, पण….’; रणवीर शौरीने सांगितला ‘तो’ अनुभव
Just Now!
X