13 December 2017

News Flash

सुपरस्टार ‘खान’दानाचा हा फोटो पाहिलात का?

त्याचे बालपण कसे होते याबाबत फारशी कोणाला माहित नाही

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 8:24 PM

बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रिटीबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचे कुतूहल असते. त्यांच्या नित्यक्रमाबद्दल जाणून घ्यायची त्यांची तीव्र इच्छा असते. पण त्यातही सर्वात जास्त कुतूहल असते ते ‘खान’दानचे. सलमानच्या कुटुंबियांबद्दलच्या चाहत्यांमधील कुतुहलाबद्दल तर सारेच जाणून आहेत. स्टार सलमानला तर सारेच जाणतात पण त्याचे बालपण कसे होते याबाबत फारशी कोणाला माहित नाही. त्याच्या चाहत्यांसाठीच जणू अरबाज खानने भावंडांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत सलमान, अरबाझ, अलवीरा आणि सोहेल खान ही चारही भावंडं वयानुसार रांगेत उभी राहिलेली दिसतात.

भाईजानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना फार आवडला असून हा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. लहानपणी कोणीही स्टार नसतं हाच काहीसा संदेश देणारा सलमानचा हा फोटो आहे. आपण लहानपणी फोटो काढायला उभे केल्यावर सगळे एकाच रांगेत शहाण्या मुलांसारखे जसे उभे राहायचो तसेच ही चारही भावंडं उभी राहिलेली दिसतात. साधारणपणे एकाच पद्धतीचे टी-शर्ट या भावंडांनी घातलेले दिसतात. या फोटोला कॅप्शन देताना अरबाजने अनेक हॅशटॅग वापरत भावंडांबद्दलचे प्रेम व्यक्त केले.

सलमानने अजून लग्न केले नसून अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोराशी लग्न केले होते. त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. अरबाज आणि मलायकाला १५ वर्षांचा अरहान हा मुलगाही आहे. तर सोहेल आणि सीमा खान यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. अलविराने अभिनेता अतुल अग्नीहोत्रीशी लग्न केले असून त्यांनाही अयान आणि अलिसा ही दोन मुले आहेत.

सलमानच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच त्याचे ‘टायगर जिंदा’ हैचे चित्रीकरण संपले. अली अब्बास जाफर दिग्दर्शित या सिनेमात तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत दिसणार आहे. ‘एक था टायगर’ या त्याच्या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे.

First Published on October 5, 2017 8:24 pm

Web Title: can you identify salman khan and his siblings in this photo