फोटोमधील या चिमुकल्याला ओळखलंत का? या मुलाने वयाच्या आठव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये त्याने आता जवळपास तीस वर्षे पूर्ण केली आहेत. फोटोतील चिमुकल्याच्या हास्यावरून या अभिनेत्याची ओळख करणं अधिक सोपं आहे. तर हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत वडील ताहिर हुसैन आहेत.

आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर कुटुंबीयांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील दुसऱ्या फोटोमध्ये आमिर आणि त्याचा भाऊ फैजल खान हे आई झीनत हुसैन आणि वडिल ताहिर हुसैन यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये आमिरचे वडिल त्यांच्या मित्रांसोबत असून त्यामध्ये अभिनेते शमी कपूरसुद्धा दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप 

आमिर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत करीना कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.