News Flash

Cannes 2018 : जेव्हा कानच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची क्वीन अवतरते

तिनं पहिल्यांदाच कान फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली आहे. यावेळी तिनं परदेशी लक्झरी ब्रँडला पसंती देण्यापेक्षा साडी नेसूनच सोहळ्याला उपस्थित राहण्याचं ठरवलं.

Cannes 2018  : जेव्हा कानच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची क्वीन अवतरते
'सब्यासाची'च्या 'अक्षतारा' कलेक्शनमधली सर्वात महागडी साडी तिनं नेसली होती.

‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला सुरूवात झालीय. या फिल्म सोहळ्याबरोबर सर्वाधिक चर्चा रंगते ती रेड कार्पेटची. कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता ट्रेंड सुरू होणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. तर यावेळी बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौतनं पहिल्यांदाच या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. कंगना बॉलिवूडमधली ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. यावेळी कानसाठी साडी परिधान करून तिनं सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

ऐश्वर्यासारखीच तिनं पदार्पणासाठी साडीला पसंती दिली. भारतातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड ‘सब्यासाची’च्या ‘अक्षतारा’ कलेक्शनमधली सर्वात महागडी साडी तिनं नेसली होती. तिच्या काळ्या रंगाच्या साडीवर हँड कट महागडे खडे जरदोजी तंत्र वापरून विणले होते. तसेच ‘सब्यासाची’च्या ज्वेल कलेक्शनमधला मोती आणि पाचूचा नेकलेसही सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता. हॉलिवूडमधल्या जून्या चित्रपटातील अभिनेत्रींसारखी केशरचना तिनं केली होती.

या रुपात कंगना खरोखरच अगदी ‘क्वीन’सारखी दिसत होती. पदार्पणातच तिनं आपल्या स्टाईलनं अनेक फॅशन प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्या राय बच्चननंही पहिल्यांदा रेड कार्पेटसाठी साडीलाच पसंती दिली होती. त्यामुळे तिची स्टाईल ऐश्वर्यापासून तर प्रभावित नव्हती ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कंगनानं एका प्रसिद्ध मद्य कंपनीची सदिच्छा दूत म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे. या सोहळ्यासाठी कंगना व्यतिरिक्त दीपिका, ऐश्वर्या, सोनम, हुमा कुरेशी या अभिनेत्री देखील उपस्थिती लावणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 10:19 am

Web Title: cannes 2018 kangana ranaut walking the red carpet at the prestigious festival
Next Stories
1 अनुष्का का करतेय सोनमचं स्वागत?
2 एका दगडात दोन पक्षी! मुंबई इंडियन्सच्या विजयाबाबत बिग बी म्हणतात…
3 नाटक बिटक : संगीत नाटकांपासून ग्रिप्स नाटकांपर्यंत!
Just Now!
X