News Flash

Cannes Film Festival 2017: ..असा असेल यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’

रेड कार्पेट, ग्लॅमर आणि ख्यातनाम कलाकारांची सांगड घालणारा 'कान'...

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१७

चित्रपटसृष्टी आणि ग्लॅमर जगतात ‘कान फिल्म फेस्टाव्हल’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा हा लाखामोलाचा ७० वा कान फिल्म फेस्टिव्हल मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. कान फिल्म फेस्टिव्हल म्हटलं की रेड कार्पेटवर हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांच्या अदा आणि त्यांचा वावर याकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल? यंदाच्या कानमध्ये भारतीय अभिनेत्रींची कोणती अदा पाहायला मिळते याकडेच सध्या सर्वांच्या नजरा आहेत. त्यासोबतच नजरा आहेत त्या म्हणजे कानवारीत यंदा कोणत्या चित्रपटांचा नजराणा सादर होणार याकडे..

‘एफटीआयआय’च्या ‘फिल्म डिरेक्शन कोर्स’मधील तृतीय वर्षात शिकणाऱ्या पायल कपाडिया या विद्यार्थिनीच्या ‘आफ्टरनून क्लाऊड्स’ चित्रपटाला कानमध्ये प्रवेश मिळाला आहे. ‘एफटीआयआय’चा चित्रपट कान्समध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच ‘आफ्टरनून क्लाऊड्स’ साकारण्यात आला होता. द्वितीय वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या अभ्यासक्रमात हा प्रोजेक्ट आम्हाला देण्यात आला होता, असं पायल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

यंदाच्या कानवारीत ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचाही सहभाग आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, तिची निर्मिती असलेल्या ‘पहुना’ (Pahuna) या सिक्कीममधील चित्रपटाचा ट्रेलरही कानमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्याशिवाय ख्यातनाम भारतीय शेफ विकास खन्नाच्या ‘बरीड सिड्स’चा (Buried Seeds) ट्रेलरही या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहे. रिमा दास यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार्स’चाही यामध्ये समावेश आहे.

‘कान’ २०१७ मध्ये प्रदर्शित होणार हे चित्रपट..
२०१७ च्या कानची सुरुवात फ्रेंच चित्रपट ‘ले फन्तोम दीस्माएल’ (इस्माएल म्हणजे भूत)ने होणार आहे (Les fantômes d’Ismaël). त्याशिवाय अमेरिकन दिग्दर्शक सोफिया कोप्पोलाचा ‘द बिगाइल्ड’ (The Beguiled), नोआ बाउम्बाचचा ‘द मायेरोव्हिट्ज स्टोरीज’ (The Meyerowitz Stories), टॉड हाइन्सचा ‘व्हन्डरस्ट्रक’ (Wonderstruck) हे चित्रपटही दाखवणार येणार असल्याचं कळत आहे. या चित्रपटांव्यतिरिक्तही इतरही बरेच चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलची रंगत वाढवणार आहेत.

‘कान’मध्ये पाहायला मिळणार ‘या’ भारतीय कलाकारांचा जलवा
ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, सोनम कपूर या अभिनेत्री कानमध्ये जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याशिवाय श्रुती हसनसुद्धा कानवारीसाठी फारच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपिकाने कानची उत्सुकता तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले पाही फोटो पाहता बॉलिवूडची ही ‘मस्तानी’ कानसाठी जरा जास्त उत्सुक असल्याचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 11:16 am

Web Title: cannes film festival 2017 all you need to know about the fest from indian celebs to film screenings
Next Stories
1 ‘त्या’ व्यापाऱ्याविरोधात शिल्पा-राजने ठोकला १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा
2 ‘माझ्या मुलांनी माझ्या नावाचा फायदा घेण्यात गैर काय?’
3 कथा पडद्यामागचीः …आणि ते मला शोधत होते
Just Now!
X