News Flash

‘कॅप्टन अमेरिका’सोबत डेटवर जा अन् करोनाग्रस्तांची मदत करा

डेटवर जा अन् करोनाग्रस्तांची मदत करा.. अभिनेत्याची भन्नाट कल्पना

करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूशी दोन हात करण्यासाठी आता सेलिब्रिटी देखील पुढे सरसावले आहे. अनेकांनी आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान अभिनेता ख्रिस इव्हान याने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक नामी शक्कल लढवली आहे. त्याच्यासोबत डेटवर जा आणि करोनाशी लढायला सरकारला मदत करा. अशी एक योजनाच त्याने सुरु केली आहे.

अॅव्हेंजर्स चित्रपटांमध्ये ‘कॅप्टन अमेरिका’ या सुपहिरोची भूमिका साकारणारा ख्रिस आपल्या चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तो ऑनलाईन डेटिंगमुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना त्याच्यासोबत व्हर्च्युल डेटवर येण्याचे आवाहन केले आहे.

ख्रिसने आपल्या इन्स्टापोस्ट खाली काही लिंक्स दिल्या आहेत. या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही त्याला भेटू शकता. या ऑनलाईन डेटिंसाठी त्याला काही पैसे द्यावे लागणार आहेत. डेटिंगमधून जमा होणारे पैसे ख्रिस जागतिक आरोग्य संघटनेला दान करणार आहे. ख्रिसची ही अनोखी अनोखी कल्पना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रयोग अभिनेत्री एमेलिया क्लार्कने देखील केला होता. तिचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही चाहत्यांनी तर तिचे कौतुक देखील केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:50 pm

Web Title: captain america chris evans offers virtual hangout for covid 19 charity mppg 94
Next Stories
1 ऋषी कपूर यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; रुग्णालय प्रशासनाला बजावली नोटीस
2 अनुष्काला युवराज म्हणाला ‘रोझी भाभी’; तुम्हाला कारण माहितीये का?
3 मारुती आश्चर्यचकित का झाला?; ऐका सुबोध दादाची गोष्ट
Just Now!
X